Bhagavad Gita : संकटाशी सामना

अर्जुनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या शूरवीरानं खचून जाऊन शस्त्रं टाकून द्यावीत? एखाद्या दुर्बळ, भित्र्या, सामान्य माणसासारखं वागावं?
Bhagavad Gita
Bhagavad Gitasakal
Summary

अर्जुनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या शूरवीरानं खचून जाऊन शस्त्रं टाकून द्यावीत? एखाद्या दुर्बळ, भित्र्या, सामान्य माणसासारखं वागावं?

श्री भगवानुवाच

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्।

अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन।।२.२

बालमित्रांनो, कल्पना करा. एवढ्या प्रचंड मोठ्या युद्धभूमीवर जेथपर्यंत दृष्टी पोहचू शकत नाही इतक्या दूर पसरलेला सैन्याचा समुदाय दिसतो आहे. केवळ एक सूचना मिळताच दोन्हीकडचे योद्धे एकमेकांवर तुटून पडणार आहेत. युद्धासाठी आवश्यक साधनसामग्री, शस्त्रं, अस्त्रं, निवासाची, अन्नपाण्याची व्यवस्था अशी सर्व सिद्धता करून झाली आहे.

त्यासाठी सर्वांनी अपार कष्ट आणि अथक प्रयत्न केले आहेत. आता सत्यासाठी अन्यायाविरुद्ध लढायचं, युद्ध जिंकायचं आणि आपलं हक्काचं राज्य परत मिळवायचं, दुष्टांना शासन करायचं आणि सर्व प्रजेला सुखी ठेवायचं, समाधानाचं आयुष्य मिळवून द्यायचं. हे सर्व साध्य करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली असताना, अर्जुनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या शूरवीरानं खचून जाऊन शस्त्रं टाकून द्यावीत? एखाद्या दुर्बळ, भित्र्या, सामान्य माणसासारखं वागावं?

खरंच, हे सर्व समजण्यापलीकडचं होतं. अशा खचून गेलेल्या अर्जुनाला पुन्हा कणखर मनानं उभं करून युद्ध करण्यास भाग पाडणं हे अत्यंत कठीण होतं. बालमित्रांनो, एखादा अतिशय हुशार बुद्धिमान विद्यार्थी पूर्ण वर्षभर खपून परीक्षेचा अभ्यास करतो.

आई, वडील शिक्षकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. मात्र, अगदी परीक्षेला जायला निघाल्यावर घाबरून जाऊन मला काहीच येणार नाही. मी पेपर लिहूच शकणार नाही, असं म्हणून रडत बसला, तर काय परिस्थिती ओढवेल? तसाच काहीसा हा प्रसंग होता.

श्रीकृष्ण म्हणतो, ‘अरे अर्जुना, या संकटाच्या प्रसंगी तुझ्या मनात हे वेडेवाकडे दुर्बळपणाचे विचार आले तरी कुठून? हे तुला शोभत नाही.’

- श्रुती आपटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com