Exam Tips : परीक्षांच्या काळात मुलांच्या मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी; तणाव दूर करण्यासाठी खास टिप्स

Exam Tips : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहेत तर आता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहेत.
Exam Tips
Exam Tips esakal

Exam Tips : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहेत तर आता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहेत.

या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काही विद्यार्थ्यांना ताण-तणाव देखील जाणवतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी? त्याबदद्ल आज आम्ही खास टिप्स सांगणार आहोत.

Exam Tips
Career Tips : महिलांसाठी बेस्ट आहेत 'हे' करिअर ऑप्शन्स, जाणून घ्या ‘या’ कोर्सेसबद्दल

सोशल मीडियापासून ठेवा अंतर

आजकाल अनेक मुलांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जणांना मोबाईल आणि सोशल मीडिया वापरण्याची जणू सवयच लागली आहे. अनेक पालकांना असे वाटते की, किमान परीक्षांच्या कालावधीमध्ये आपल्या मुलाने किंवा मुलीने सोशल मीडियापासून अंतर ठेवावे. हे अगदी योग्य देखील आहे.

परंतु, अशा स्थितीमध्ये पालकांनी आपल्या मुलांवर सोशल मीडिया पूर्णपणे सोडण्याचा दबाव टाकू नये. यामुळे, मुले नैराश्यात जाऊ शकतात. अशा स्थितीमध्ये पालकांनी मुलांचे एक रूटीन बनवावे. या कामी पालक त्यांच्या मुलाचे मित्र किंवा शिक्षकांची देखील मदत घेऊ शकतात. (Keep distance from social media)

पालकांनो मुलांसोबत वेळ घालवा

वर्षभर मुलांनी परीक्षेची तयारी केलेली असते. अभ्यास देखील केलेला असतो. मात्र, अनेक पालक बोर्डाच्या परीक्षा जवळ येताच मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. जे अत्यंत चुकीचे आहे. अशा स्थितीमध्ये उलट पालकांनी मुलांसोबत एक मित्र म्हणून संवाद साधवा. तुमचा मुलगा किंवा मुलगी तणावात असेल, तर त्यांना समजावून सांगा. या दरम्यान मुलांसोबत वेळ घालवा, त्यांना अभ्यासामध्ये मदत करा. (parents spents time with children)

परीक्षांच्या काळात काय करावे आणि काय करू नये ?

  • पालकांनी घरात शक्य तितके सकारात्मक वातावरण ठेवावे.

  • घरात कोणतेही भांडण किंवा वाद-विवाद करू नये.

  • काही काळासाठी सोशल मीडिया किंवा मनोरंजनाची माध्यमे बंद करा किंवा त्याची एक निश्चित वेळ ठरवा.

  • मुलांना अभ्यासासाठी प्रेरित करा त्यांच्यावर दडपण येईल असे वागू नका.

  • तुमच्या मुलाची किंवा मुलीची इतर मुलांसोबत अजिबात तुलना करू नका.

  • मुलांना त्यांच्या विषयांची उजळणी करण्यास मदत करा.

Exam Tips
HSC Exam 2024: बारावीच्या परीक्षार्थीना मिळणार 10 मिनिटे जादाचा वेळ पण.. शिक्षण विभागाने दिल्या महत्त्वाच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com