esakal | सीएच्या अंतिम परीक्षेत बहिण-भावाची उत्तुंग झेप; नंदिनी देशात पहिली
sakal

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली : नंदिनी अगरवाल आणि सचिन अगरवाल या दोघा भाऊ-बहिणीनं सीएच्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. या परीक्षेत नंदिनी देशात पहिली आली आहे.

सीएच्या परीक्षेत बहिण-भावाची उत्तुंग झेप; नंदिनी देशात पहिली

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : चार्टर्ड अकाऊंट्स अर्थात सीएचा अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत नंदिनी अगरवाल आणि सचिन अगरवाल या बहिण-भावानं उत्तुंग यश मिळवलं आहे. सीए सारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळं हे दोघेही देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. नंदिनी या परीक्षेत देशात पहिली आली आहे तर तिचा भाऊ सचिन हा देशभरात १८ व्या रँकवर आहे.

नंदिनी अगरवाल ही १९ वर्षांची असून तिचा भाऊ सचिन अगरवाल हा २१ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्यांनी मिळवलेलं हे यश लाखमोलाचं आहे. कारण सीएच्या अंतिम परीक्षेच्या देशात ८३,६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. इतक्या विद्यार्थ्यांमधून या बहिण-भावानं मिळवलेलं यश विशेष आहे. नंदिनी ८०० पैकी ६१४ गुण मिळवून देशात पहिली आली आहे.

हेही वाचा: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; नंदिनी अगरवाल देशात पहिली

हे दोघेही मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील व्हिक्टर कॉन्व्हेट स्कूलचे विद्यार्थी आहेत. सन २०१७ मध्ये सचिन आणि नंदिनी या दोघांनी बारावीची परीक्षा दिली. लहान असतानाच नंदिनीला तिच्या पालकांनी थेट दोन वर्षे पुढील इयत्तेत टाकल्यानं ती आपल्या मोठ्या भावासोबत इयत्ता दुसरीपासून एकाच वर्गात शिकत आहे.

नंदिनीनं सांगितला अभ्यास कसा केला?

भावासोबत आपण शाळेपासून 'सीए'पर्यंतचा अभ्यास कसा केला हे सांगताना नंदिनी सांगते, "माझा भाऊ आणि मी शाळेपासून एकाच वर्गात शिकत आहोत. आम्ही IPCC आणि CA च्या अंतिम परीक्षेसाठी एकत्रच अभ्यास केला. आमची अभ्यास करण्याची पद्धत सोपी होती. आम्ही एकमेकाला अभ्यासात मदत करायचो पण जास्तीत जास्त एकमेकाच्या अभ्यासाची समिक्षा करायचो. जेव्हा आम्ही प्रश्नपत्रिका सोडवायचे तेव्हा सचिन माझी उत्तरं तपासायचा तसेच मी त्याची उत्तरं तपासत होते. तसेच जेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी व्हायचा तेव्हा माझा भाऊ मला पाठिंबा द्यायचा आणि त्यानंतर मी पुन्हा अभ्यासात सक्रीय व्हायचे." नंदिनीनं यंदाच्या सीएच्या परीक्षेत ऑल इंडिया रँक १ वर आहे तर IPCC परीक्षेत ती ऑल इंडिया रँकिंगमध्ये ३१ वा क्रमांकावर आहे.

loading image
go to top