BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

BSNL Recruitment 2025 : जाणून घ्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अन्य महत्त्वाची माहिती
BSNL Recruitment 2025

BSNL Recruitment 2025

esakal

Updated on

BSNL Recruitment 2025: Job Opportunity for Freshers : टेलिकॉम कंपनीत सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. भारत सरकारची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने भरतीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणी अनुभवी नाहीतर फ्रेशर्स देखील अर्ज करू शकणार आहेत.

बीएसएनएलने टेलिकॉम आणि फायनान्स स्ट्रीममध्ये वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी (DR) पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरती अभियानात १२० पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यासंदर्भात २७ ऑक्टोबर रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली. अर्ज प्रक्रिया लवकरच अधिकृत वेबसाइट bsnl.co.in वर सुरू होईल.

शैक्षणिक पात्रता –

मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इत्यादी विषयात किमान ६० टक्के गुणांसह पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी (बीई)/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) पदवी असायला हवी.

BSNL Recruitment 2025
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाला मोदी सरकारची मंजुरी

 वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थीसाठी, चार्टर्ड अकाउंट (सीए) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी (सीएमए) पदवी असलेले उमेदवार पात्र आहेत. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही, म्हणूनच नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.

BSNL Recruitment 2025
Air India Bus Fire VIDEO : दिल्ली विमानतळावर पेटली एअर इंडियाची बस, थोडक्यात टळली भीषण दुर्घटना!

वरील पदासाठी मूळ वेतन २४ हजार ९०० रुपये ते ५० हजार ५०० प्रति महिना असणार आहे. तसेच इतर भत्ते देखील उपलब्ध असतील. याचबरोबर या भरतीसाठी किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे वय पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तर यासाठी निवड प्रक्रिया ही संगणक-आधारित लेखी परीक्षेद्वारे असणार आहे. बीएसएनएल लवकरच या भरतीसाठी अर्ज तारखा, परीक्षा योजना, परीक्षा शुल्क आणि ऑनलाइन नोंदणी लिंक्स बद्दल माहिती जारी करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com