esakal | सीए फाइनल, सीए इंटरमीडिएट परीक्षा ढकलली पुढे; अंतिम तारीख कोणत्याही क्षणी होणार जाहीर

बोलून बातमी शोधा

CA Final
सीए फाइनल, सीए इंटरमीडिएट परीक्षा ढकलली पुढे; अंतिम तारीख कोणत्याही क्षणी होणार जाहीर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इंडियाने (आयसीएआय) कोविडच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित सीए अंतिम आणि सीए इंटरमीडिएट परीक्षा मे'मध्ये तहकूब केल्या आहेत. आयसीएआयने प्रसिद्ध केलेल्या माहितीत असे म्हटले आहे, की सध्याच्या कोविड समस्येपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे 21 मे'ची सीए अंतिम आणि 22 मे'ची सीए इंटरमीडिएट परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

सद्यस्थिती सुधारण्याबाबत केंद्र, राज्य व आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे नवीन तारखेची घोषणा केली जाईल, असे नमूद केले आहे. आयसीएआय धनबाद शाखेचे अध्यक्ष प्रतिक गनेरीवाला म्हणाले, परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्यांना नवीन तारीख कळविली जाईल. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आयसीआयसीआय अधिकृत वेबसाइटवर www.icai.org भेट देत राहण्याचा सल्लाही दिला आहे.

दहावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; तब्बल 1074 पदांसाठी सरकारी नोकर्‍या, दरमहा 1.60 लाखांपर्यंत पगार

ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

आयसीएआयने ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. यासाठी अर्जदारांना कोणतीही अतिरिक्त फी भरावी लागणार नाही. आयसीएआयने अधिसूचनेत म्हटले आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे फॉर्म आता 30 जून पर्यंत भरता येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.