CA Intermediate Result: महाराष्ट्राच्या शार्दूल विचारेने मारली बाजी, देशात पहिला ! दुसरा नंबर कुणाचा ? असा पहा निकाल...

मे २०२६ च्या सीए इंटरमीडिएट परीक्षेत डोंबिवलीच्या शार्दूल विचारेने ‘ऑल इंडिया रँक १’ मिळवल्याने त्याचे देशभरात कौतुक होत आहे.
CA Inter Result: AIR 1 from Maharashtra

CA Inter Result: AIR 1 from Maharashtra

Updated on

इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) कडून मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या 'सीए इंटरमीडिएट' (CA Intermediate) परीक्षेचा निकाल बुधवारी लागला. या परीक्षेत महाराष्ट्राच्या शार्दूल शेखर विचारे याने घवघवीत यश मिळवत संपूर्ण देशात पहिला नंबर (AIR 1) मिळवला आहे. डोंबिवलीला राहणारा शार्दूल याने ६०० पैकी तब्बल ५३१ मार्क्स मिळवले असून त्याची टक्केवारी ८८.५०% इतकी आहे.

फक्त एका मार्काने हुकला पहिला नंबर

या परीक्षेत कोचीच्या अभिनव सतीश याने ६०० पैकी ५३० (८८.३३%) मार्कांसह देशात दुसरा नंबर मिळवला. तर मुंबईचाच तीर्थ जैन ५१९ (८६.५०%) मार्क्स मिळवून देशात तिसरा आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com