CA अभ्यासक्रमासाठी नवे धोरण ठरणार; लवकरच निर्णयाची शक्यता

uday samant
uday samantuday samant
Summary

वर्षभरात असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी : सी.ए अभ्यासक्रमाकडे (C.A Syllabus) जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे याकरिता लवकरच धोरण ठरवण्यासाठी महिन्याभरात निर्णय घेऊ. असे धोरण ठरवणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी येथे केले. तसेच सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी (ratnagiri News) शाखेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सीए इन्स्टिट्यूटच्या (C.A Institute) रत्नागिरी शाखेतर्फे मथुरा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल बॉडीच्या अध्यक्षांसह समितीने रत्नागिरीला भेट दिली. याप्रसंगी शाखेचे अध्यक्ष सीए आनंद पंडित यांनी कार्यालयासाठी जागा मिळण्याबाबत मंत्र्यांना विनंती केली. त्यानंतर सामंत यांनी कार्यालयासाठी जागा देण्याकरिता नगरपालिकेशी बोलतो. रत्नागिरी छोटे शहर आहे. परंतु नगरपालिकेची पूर्तता झाल्यावर जागा मिळेल, असे स्पष्ट केले.

uday samant
'एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाले 15 कोटी'

ते म्हणाले, आम्ही विद्यार्थ्यांना बीकॉम, एमकॉम होण्यासाठी सांगतो. पण देशाकरिता सीएंचीसुद्धा जास्त गरज असल्याने या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे. याकरिता येत्या महिन्याभरात धोरण ठरवतो. याकरिता इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम ठरवू. तो विद्यापीठामार्फत कसे पुढे नेता येईल, ते पाहूया. वर्षभरात असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. 'सी.ए'नी चिपळूण पूरग्रस्तांना सढळहस्ते मदत केल्याबद्दल त्यांना कौतुक केले.

यावेळी वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल बॉडीचे अध्यक्ष सीए मनिष गाडिया, उपाध्यक्ष सीए दृष्टी देसाई, सेक्रेटरी सीए अर्पीत काब्रा, विकासा अध्यक्ष सीए यशवंत कासार, तसेच सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए चंद्रशेखर चितळे, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए आनंद पंडित व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार कमिटी मेंबर सीए बीपिन शाह, सीए अॅंथनी राजशेखर यांनी केले. सीए कमलेश मलुष्टे आणि सीए अक्षय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. रत्नागिरी शाखा उपाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर यांनी आभार मानले.

uday samant
काबूल एअरपोर्टवर चेंगराचेंगरी; सात नागरिकांचा मृत्यू

हे खरे आयडॉल

माझे समोर बसलेले काही सीए मित्र कसा अभ्यास करत होते, हे मी पाहिले आहे. त्यांचा अभ्यास बघूनच गरगरायचे. मला वाटते सीएपेक्षा राजकारण बरे. पण आज पाच दशके सीए म्हणून काम करणारे एच. एल. पटवर्धन, नीळकंठ पटवर्धन यांच्यासारखे सातत्य आमच्यात नाही. हे खरे आयडॉल आहेत. आम्हाला दर ५ वर्षांनी लिटमस, अॅसिड टेस्ट द्यावी लागते, असे सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com