
यूपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आणखी एक संधी दिली जाणार नाही, असं स्पष्टीकरण अॅडिशनल सॉलिसिटर जनरल एस.वी.राजू यांनी सुनावणी दरम्यान दिले.
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे या परीक्षेत भाग घेण्यास असमर्थ ठरलेल्या उमेदवारांना शेवटची संधी दिली जाणार नाही. एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने २२ जानेवारी २०२१ रोजी ही माहिती सुप्रीम कोर्टात दिली आहे.
- तरुणांनो! नोकरीची सुवर्णसंधी, 'स्टाफ सिलेक्शन'द्वारे ६ हजार ५०६ जागांसाठी भरती; 'असा' करा अर्ज
यूपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आणखी एक संधी दिली जाणार नाही, असं स्पष्टीकरण अॅडिशनल सॉलिसिटर जनरल एस.वी.राजू यांनी सुनावणी दरम्यान दिले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर, न्या. बी.आर.गवई आणि न्या. कृष्णमुरारी यांच्या खंडपीठाकडे होती. या खंडपीठाने केंद्र सरकार आणि यूपीएससीला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि सुनावणी पुढे ढकलली.
- इंजिनिअर्स तरुण-तरुणींनींना SBIमध्ये नोकरीची संधी; कोणतीही लेखी परीक्षा नाही
यापूर्वी ११ जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल एस.व्ही.राजू यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले होते की, नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आणखी एक संधी द्यायची की नाही याबाबत केंद्र सरकार आणि आयोग विचार करत आहे.
दरम्यान, यूपीएससी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ६ संधी देते आणि उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच ओबीसी उमेदवारांना ९ संधी आणि ३५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर एससी, एसटीचे उमेदवार ३७ वर्षांपर्यंत परीक्षा देऊ शकतात.
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)