
काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागला. यानंतर आता दहावीच्या निकालाचीही प्रतिक्षा असून येत्या १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
दहावी आणि बारावी हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यानंतरही खऱ्याअर्थाने भविष्याच्या दृष्टीने पावले टाकले जातात. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच पालकही पुढील करियरच्या दिशा शोधत असतात. यासाठी मार्गदर्शनही घेतात. आता विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी करियरच्या वाटा उपलब्ध आहेत.