student
studente sakal

कॉमर्समधून करता येणार यशाचे मॅनेजमेंट, वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वाधिक संधी

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने (state education board) मंगळवारी (ता.३) बारावीच्या निकालाची घोषणा केली. यावेळी विभागातही वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक लागला. गेल्या काही वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे वाणिज्य अभ्यासक्रमातील (commerce education) विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वाणिज्य अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे मॅनेजमेंट करता येणे शक्य होणार आहे.

student
पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

बारावीचे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांचे निकाल यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा यंदा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुणदान करण्यात आले. त्यामुळे निकालाने चांगलीच उसळी घेतली. जवळपास सर्वच शाळांमध्ये चांगल्या गुणांसह विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता बारावीनंतर नेमका कोणता अभ्यासक्रम निवडायचा याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी असून पारंपरिक अभ्यासक्रमांसह नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांचाही समावेश यामध्ये आहे. त्यामुळे अगदी मार्केटिंग ते सीए आणि फायनान्शिअल अ‍ॅनॅलिस्ट होण्याची संधी आहे.

पारंपरिक अभ्यासक्रम -

बीकॉम (अकाऊंटन्सी अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स)- बीकॉम (फायनान्शियल मार्केट्स), बीएमएस (बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज), बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), बीएएलएलबी, बीसीसीए, बीएमएस, सीए, बीबीएस, बीएचएम, बीसीए.

करिअर संधी -

अकाउंटन्ट, फायनान्स कंट्रोलर, अकाउंटन्ट एक्झिक्युटिव्ह, चार्टर्ड अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, फायनान्स अ‍ॅनॅलिस्ट, फायनान्स कंट्रोलर, फायनान्स मॅनेजर, फायनान्स कन्सल्टंट, इनव्हेस्टमेंट अ‍ॅनॅलिस्ट, स्टॉक ब्रोकर, पोर्टफोलिओ मॅनेजर, टॅक्स ऑडिटर, टॅक्स कन्सल्टंट, ऑडिटर, स्टॅटिस्टियन, इकॉनॉमिस्ट, क्रेडिट मॅनेजर, ज्युनिअर अकाउंटंट, बुक कीपर, इंटरनेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह- ई-कॉमर्स, कॉर्पोरेट लॉयर.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्‍नाच्या वाढीमध्ये वाणिज्य क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे येत्या काळात ते योगदान अधिक वाढणार आहे. कोरोना काळातही त्याचे महत्त्व अबाधित राहिले आहे. त्यातील संधी या रोजगार निर्मितीसाठीही महत्त्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक संधी आहेत.
डॉ. सुरेंद्र जिचकार, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com