बीटेकमधील करिअरच्या संधी; २६ नोव्हेंबरच्या वेबिनारसाठी अशी करा नोंदणी | Career Opportunities in B Tech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीटेकमधील करिअरच्या संधी; २६ नोव्हेंबरच्या वेबिनारसाठी अशी करा नोंदणी

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने बीटेकमधील करिअरच्या संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

बीटेकमधील करिअरच्या संधी; २६ नोव्हेंबरच्या वेबिनारसाठी अशी करा नोंदणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने बीटेकमधील करिअरच्या संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या वेबिनारमध्ये असोसिएट प्रोफेसर डॉक्टर दिनेश भूटडा हे मार्गदर्शन करणार आहेत. एमआयटीच्या वतीने या वेबिनारचे आयोजन २६ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता केले आहे. यामध्ये बीटेकमध्ये असलेल्या करिअरच्या संधी यासह विविध अभ्यासक्रम याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये बी.टेक कार्यक्रमासह, विद्यार्थी भारताच्या तिसऱ्या सर्वोत्तम खाजगी विद्यापीठात शिकतात. येथे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या पुढील युगासाठी सशक्त केले जाते, ज्यामुळे करिअर आणि संशोधनाच्या संधी खुल्या झाल्या आहेत. २६ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा. यामध्ये तुमचे नाव, इमेल आयडी, फोन नंबर आणि अभ्यासक्रम निवडल्यानंतर ती माहिती सबमिट करा.

हेही वाचा: दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रीया गुरुवार पासून सुरू

विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या पुढील काळात सक्षमपणे उभा राहण्यास सज्ज केलं जातं. जीवन कौशल्य विकास, मानवी मूल्ये, जागतिक शांतता आणि जागतिक नागरिकत्वाची भावना यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयू भर देते.

बी.टेक हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे, जो बारा तिमाहीत विभागलेला आहे. सर्व विषयांमध्ये व्यावसायिक आणि खुले पर्याय अत्याधुनिक ज्ञान देतात आणि विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडण्याची मुभासुद्धा देण्यात आली आहे.

loading image
go to top