दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रीया गुरुवार पासून सुरू | SSC Exam Form | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

11th online admission
दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रीया गुरुवार पासून सुरू

दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रीया गुरुवार पासून सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात २०२२ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रीया गुरुवार (ता. १८) पासून सुरू झाली असून, अंतिम मुदत २० डिसेंबरपर्यंत देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परिपत्रक काढून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी परीक्षार्थी, पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले, खासगी विद्यार्थी अर्ज करू शकता. तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय ठेवून, आयटीआयचे विद्यार्थीही आवेदन करू शकता असे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आवेदनपत्र भरायच्या कालावधीत माध्यमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र ऑनलाइन सबमीट केल्यावर, शाळांना त्यांच्या लॉगीन मधून पूर्व यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शाळांनी त्याची प्रिंट काढून यादी पडताळणे गरजेचे आहे.

हेही वाचा: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

महत्त्वाच्या तारखा -

- सरल डेटाबेसमधून नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरणे - १८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर

- पुर्नपरीक्षार्थी व इतर विद्यार्थी - १० डिसेंबर ते २० डिसेंबर

- विलंब शुल्कासह - २८ डिसेंबर (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

- माध्यमिक शाळांनी शुल्क भरावयाची मुदत - ३० डिसेंबर पर्यंत

- शाळांनी शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याद्या सादर करणे - ४ जानेवारी २०२२

अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ - https://t.co/KX9sqYIXLT

loading image
go to top