

Career Vedh: Hard Work vs. Smart Work by Vinayak Dravid
Sakal
विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
सर्वसाधारणतः असा एक समज आहे की हार्ड वर्क करणारे म्हणजे जुन्या विचारांचे, किंवा जुन्या पिढीचे व स्मार्ट वर्क करणारे म्हणजे नव्या पिढीचे किंवा ‘जेन झी’, प्रत्यक्षात हे दोन्हीही विचार किंवा समज चुकीचे आहेत. दोन्ही कार्यपद्धतीत काय फरक आहे हे समजून घेऊयात. हार्ड वर्क म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेले काम, ज्यामध्ये काम करणारा कोणतेच प्रश्न विचारत नाही, त्याला दिलेले काम तो चोख करेल. परंतु वर्षानुवर्ष तो त्याच पद्धतीने काम करेल व त्यात समाधानी राहील. खरंतर ही एक समस्या आहे, ज्या कामात अनेक सुधारणा करणे शक्य आहे, ज्यामध्ये कार्यक्षमता वाढविणे शक्य आहे, ही मंडळी त्याच पद्धतीने काम करत राहतात. थोडक्यात ते आयुष्यभर ‘कम्फर्ट झोन’मध्ये राहणे पसंत करतात, नवीन शिकण्याची इच्छा व ऊर्जा हे लोक दाखवत नाहीत. एक गोष्ट आहे, ते कामात शक्यतो चुका करत नाहीत. आजही काही कामे अशी असतात जिथे हार्ड वर्कची गरज भासते.