CBSE बोर्ड टर्म 2 निकालाबाबत नवीन अपडेट जारी; जाणून घ्या, कधी लागणार Result

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी CBSE 2022 बोर्ड निकालाबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे.
CBSE
CBSEsakal media

नवी दिल्ली : ​केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी CBSE 2022 बोर्ड निकालाबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर CBSE बोर्ड 24 जुलै 2022 नंतर कधीही 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पार पडलेल्या बैठकीत बोर्डाच्या परीक्षेचा (Exam) निकाल जाहीर करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (CBSE Term 2 Exam Result Update Latest News In Marathi)

CBSE
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? CM शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल

सीबीएसई बोर्डाने (CBSE Board ) घेतलेल्या परीक्षांच्या निकालबाबत बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसई बोर्डाने निकालाला उशीर केलेला नसल्याचे म्हटले होते. तसेच लवकरच बोर्ड 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल वेळेवर जाहीर करेल असे विधान केले होते. मात्र, अद्यापपर्यंत बोर्डाकडून निकालाबाबतच्या तारखेबाबत अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर 24 जुलैनंतर कधीही परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

CBSE
‘CBSE’मुळे रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा प्रस्ताव! मंत्र्याअभावी निर्णय रखडला

दरम्यान, परीक्षांचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbresults.nic.in वरून निकाल पाहू शकणार आहेत. अलीकडेच बोर्डाने डिजिलॉकर पिन देखील जारी केला असून, या वर्षी परीक्षा दिलेले विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवरून तसेच डिजिलॉकरद्वारे त्यांचे निकाल पाहू शकणार आहेत. यावर्षी 35 लाख विद्यार्थांनी CBSE बोर्डाची इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 ची परीक्षा दिली आहेत. टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर आता पालकांना आणि विद्यार्थांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

निकाल कसा तपासायचा?

1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.

2. त्यानंतर 10वी किंवा 12वी वर्ग निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.

3. यानंतर बोर्ड रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक टाका.

4. आता सबमिट बटणावर क्लिक करा.

5.CBSE बोर्ड इयत्ता 10वी, 12वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com