CBSE बारावीचा निकाल जाहीर; यंदाच्या वर्षी मुलींनी मारली बाजी

CBSE बारावीचा निकाल जाहीर; यंदाच्या वर्षी मुलींनी मारली बाजी 99 टक्क्यांहून जास्त विद्यार्थी उत्तीर्ण; असा पाहा निकाल CBSE 12th Result 2021 declared Girls shine slightly more than boys
Students
Students

99 टक्क्यांहून जास्त विद्यार्थी उत्तीर्ण; असा पाहा निकाल

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज CBSE 12 वीचा निकाल जाहीर केला. बोर्डाची अधिकृत वेबसाइट असलेल्या cbseresults.nic.in वर हा निकाल जाहीर केला असून http://cbseresults.nic.in/class12/Class12th21.htm या लिंकवरून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. CBSE 12 वी बोर्ड परीक्षेच्या निकाल तपासण्यासाठी आणि निकाल डाऊनलोड करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्याचा सल्ला मंडळाकडून देण्यात आला आहे. यंदा CBSE 12वीचा निकाल ९९.३७ टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या 0.54 टक्के जास्त आहे. (CBSE 12th Result 2021 declared Girls shine slightly more than boys)

निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा-

http://cbseresults.nic.in/class12/Class12th21.htm

CBSE 12वी 2021च्या निकालामध्ये एकूण 70,004 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत तर एकूण 1,50,152 विद्यार्थ्यांनी 90% ते 95% या टक्केवारीत गुण मिळवले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 65,184 विद्यार्थ्यांचे निकाल हे अद्याप प्रक्रियेत असल्याने पाच ऑगस्टपर्यंत जाहीर केले जातील. CBSE DigiLocker च्या माध्यमातून पहिल्यांदाच परदेशी विद्यार्थीदेखील त्यांचे निकाल ई-मेलवर मार्कशीटसह मिळवू शकतील अशी माहिती CBSEने एका नोटीसमध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com