esakal | आता वार्षिक परीक्षेसाठी 9 वी, 11 वीची 'प्रश्नपत्रिका' बोर्ड तयार करणार!
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE

आता देशातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता नववी आणि बारावीची परीक्षा एकाच प्रश्नपत्रिकेव्दारे घेण्यात येणार आहे.

आता वार्षिक परीक्षेसाठी 9 वी, 11 वीची 'प्रश्नपत्रिका' बोर्ड तयार करणार!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

इयत्ता नववी आणि अकरावीची (CBSE 9th, 11th Exam) 'प्रश्नपत्रिका' केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) शैक्षणिक सत्र 2021-22 पासून तयार करण्याची योजना आखण्यात आलीय. म्हणजेच, आता देशातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता नववी आणि बारावीची परीक्षा एकाच प्रश्नपत्रिकेव्दारे घेतली जाईल. याबाबत बोर्डाने सर्व शाळांना माहिती दिल्याचा दावाही केलाय. मात्र, सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर अशी कोणतीही अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. आत्तापर्यंत इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षेसाठी 'प्रश्नपत्रिका' शाळेने तयार केल्या होत्या. यात मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता.

बोर्डाकडून 'प्रश्नपत्रिका' तयार करण्यास सुरुवात

माध्यमांच्या अहवालात असा दावा केला जात आहे, की सीबीएसई बोर्डाने इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षेसाठी (2022) प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलीय. बोर्डानं सर्व सीबीएसई संलग्न शाळांमधून इयत्ता नववी आणि अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मागवलीय. याशिवाय, वार्षिक परीक्षेच्या तारखाही मंडळाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्व सीबीएसई शाळांना निर्धारित वेळापत्रकानुसार, इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

हेही वाचा: पोलीस दलात कॉन्स्टेबलसह 'एसआय'ची भरती

दहावी, बारावीच्या पॅटर्नमध्येही मोठे बदल

दरम्यान, सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या पॅटर्नमध्येही काही बदल केले आहेत. या बदलानुसार, दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाचे दोन भाग करण्यात आले असून यात दोन्ही भागांची परीक्षा स्वतंत्र असेल. ज्याला बोर्डाने टर्म 1 आणि टर्म 2 असं नाव दिलंय. याचा अभ्यासक्रम नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या टर्म 1 मध्ये येईल, तर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या टर्म 2 मध्ये उर्वरित अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जातील. कोरोना महामारीमुळे बोर्डाने हा निर्णय घेतलाय. मंडळाचा असा दावा आहे, की जर कोरोनामुळे सत्र 2021-22 मध्ये बोर्डाची परीक्षा घेतली गेली नाही, तर निकाल टर्म 1 आणि इतर परीक्षांच्या आधारावर तयार केला जाऊ शकतो. या नवीन पॅटर्न आणि टर्म परीक्षेबाबत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी बोर्डानं टर्म -1 नमुना पेपरही जारी केलाय.

loading image
go to top