esakal | पोलीस दलात कॉन्स्टेबलसह 'एसआय'ची भरती; 12 वी पास देखील करु शकतात अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment 2021

कर्नाटकात राज्य पोलिसांकडून कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांवरील भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आलीय.

पोलीस दलात कॉन्स्टेबलसह 'एसआय'ची भरती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Police Recruitment 2021 : कर्नाटकात राज्य पोलिसांकडून कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर (KSP Recruitment 2021) पदांवरील भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आलीय. उमेदवार, या पदांसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे ksp.gov.in अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालीय, तर अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2021 निश्चित करण्यात आलीय. एकूण, 100 रिक्त पदांवर भरती केली जाईल. दरम्यान, जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत करण्यात येणार आहे.

रिक्त पदांची संख्या

  • कॉन्स्टेबल - 50 पदे

  • उपनिरीक्षक - 20 पदे

शैक्षणिक पात्रता : कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, उपनिरीक्षक पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवी उत्तीर्ण असायला हवा. या दोन्ही पदांसाठी उमेदवाराने संबंधित खेळातील राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला असावा.

वयोमर्यादा : कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षे असावे, तर उपनिरीक्षक पदासाठी उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे असावे.

हेही वाचा: CET 2021 : 15 सप्टेंबरपासून CET परीक्षेला सुरुवात

अर्ज फी : कॉन्स्टेबल पदासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तसेच, एसआय पदासाठी सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी 500 रुपये, तर एससी व एसटी श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये अर्ज फी भरावी लागेल.

निवड प्रक्रिया : या पदांवर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणीच्या (पीएसटी) आधारे केली जाईल.

हेही वाचा: Railway Jobs 2021 : रेल्वेत 'या' पदांसाठी परीक्षा न घेता भरती

महत्वाच्या तारखा

  • अर्ज भरण्याची तारीख - 31 ऑगस्ट 2021

  • अर्जाची शेवटची तारीख - 29 सप्टेंबर 2021

  • अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख - 1 ऑक्टोबर 2021

  • अधिकृत वेबसाईट - ksp.gov.in

loading image
go to top