CBSE : परीक्षेदरम्यान पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सीबीएसईचे आवाहन

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहे.
CBSE
CBSEsakal
Summary

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहे.

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षेदरम्यान विविध सोशल मीडिया साईटस्‌वर पेपर फुटणे किंवा प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी अमुक करा, अशा अफवा आणि खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. परंतु या अफवांवर परीक्षार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, अशी माहिती ‘सीबीएसई’ने जाहीर सूचनेद्वारे दिली. तसेच अशाप्रकारे अफवा आणि चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

सीबीएसईच्या वतीने २०२३ या वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून ५ एप्रिलपर्यंत या परीक्षा असणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी मंडळाने विस्तृत नियोजन केले असून त्याप्रमाणे परीक्षा सुरळीत होत असल्याचे मंडळाने सांगितले. परंतु या परीक्षेबाबत यु-ट्युब, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया साईट्सवर पेपर फुटला किंवा प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी अमुक करा, अशी चुकीची माहिती अथवा अफवा पसरविल्या जात आहे. त्याद्वारे विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लुट होत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. अशा बेजबाबदार कृत्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

अफवा आणि खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांबाबत मंडळ सावध झाले असून आता संबंधितांच्या विरोधात कारवाईसाठी पावले उचलली जात आहेत. त्यासाठी मंडळाने दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ला कळविले आहे. सोशल मिडियाचा वापर करून अफवा किंवा खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांविरोधात विरोधात कडक कारवाई करण्याबाबत पोलिसांना सांगण्यात असल्याचेही मंडळाने जाहीर सूचनेत नमूद केले आहे. तसेच अफवा, खोट्या बातम्या पसरविण्यामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात देखील कारवाई केली जाणार असल्याचेही सीबीएसईने कळविले आहे. तसेच अशा अफवांना बळी पडू नये आणि अफवा पसरविण्यात सहभागी होऊ नये, याबाबत पालकांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे, असेही मंडळाने सुचविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com