esakal | CBSE Board : वर्षातून दोन वेळा होणार दहावी-बारावी परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Students

CBSE Board : वर्षातून दोन वेळा होणार दहावी-बारावी परीक्षा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

CBSE Class 10, 12 Board Exams 2022 : कोरोना महामारीचा धोका लक्षात घेऊन सीबीएसईने 2021-22 या नवीन सत्रामध्ये मोठा बदल केला आहे. शैक्षणिक दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात सीबीएसईने सोमवारी मोठा निर्णय घेतला आहे. 2021-22 या सत्रापासून वर्षातून आता दोन वेळा परिक्षा होणार आहेत. याचा आराखडा सीबीएसईने तयार केला आहे. यासंबंधीचं परिपत्रक बोर्डाने जारी केलं आहे. यात परीक्षा कशा पद्धतीने होईल, सिलॅबस काय असेल, अंतर्गत मूल्यमापनाचे धोरण काय असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 हे शैक्षणिक वर्ष दोन टर्ममध्ये विभाजित करण्यात आलं आहे. प्रत्येक टर्ममध्ये 50-50 टक्के अभ्यासक्रम पुर्ण होईल आणि त्यानंतर परिक्षा घेतल्या जातील. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येईल, असं सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: नारायण राणेंना दिल्लीवरुन आमंत्रण

कोरोना संकटात शाळा व कॉलेजेस ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. महारामारी दीड वर्षांपासून तळ ठोकून असून कमी होण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे आता परीक्षा घेण्याची शक्यता कायम राहावी यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षा जरी वर्षातून दोनवेळा होणार असल्या तरी अभ्यासक्रम तोच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा: मॉन्सून परतणार; राज्यात पावसाची शक्यता

loading image