esakal | शिक्षकांसाठी खुशखबर! CBSE बोर्डाचा नवा उपक्रम, शाळेसह विद्यार्थ्यांना होणार 'लाभ'

बोलून बातमी शोधा

CBSE Board

शिक्षकांसाठी खुशखबर! CBSE बोर्डाचा नवा उपक्रम, शाळेसह विद्यार्थ्यांना होणार 'लाभ'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : नवीन शिक्षण धोरणांतर्गत शिक्षकांचे कौशल्य विकास वाढविण्यासाठी सीबीएसई बोर्डामार्फत व्यावसायिक विकास कार्यक्रम आयोजित केला जाणार असून याची लवकरच सुरुवात होणार आहे. दरम्यान, बोर्डाशी संबंधित असलेल्या शाळांमधील शिक्षकांनी वर्षात 50 तासांच्या ऑनलाइन सत्रात सक्तीने भाग घेणे अनिवार्य राहणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितलेय. (CBSE Board Skill Development Training Activities)

या ऑनलाइन सत्रात नवीन शिक्षण धोरणांतर्गत होणाऱ्या विविध बदलांची तज्ञ माहिती देणार असून यासंदर्भात संचालक कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण डॉ. विश्वजित साहा यांनी मंडळाच्या वतीने एक परिपत्रक काढले आहे. अधिकाधिक शिक्षक यामध्ये सहभागी होऊ शकतील, यासाठी त्यांनी सर्व मुख्याध्यापकांना शाळेतील सर्व शिक्षकांना याची माहिती देण्यास सांगितले आहे. शिक्षकांनाही दरमहा बोर्डाच्या वतीने दोन सत्रात विनामूल्य भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

NHAI Recruitment : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 41 पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

असा घ्या ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग..

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, मंडळाच्या संकेतस्थळावर प्रशिक्षण शाखेची लिंक असेल. या लिंकवर क्लिक करून शिक्षक ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.

या विषयांवर होणार संवाद

  • इनोव्हेटिव्ह पेडोगॉजीज

  • शिक्षणाच्या पद्धती

  • इंटिग्रेशन ऑफ आर्ट आणि खेळाच्या पध्दती

  • क्लास रुम आणि दररोजच्या जीवनातील लाइफ स्कील

  • सायबर सेफ्टी, ब्लेंडेड लर्निंग, चाइल्ड साइकोलॉजी

सीबीएसईच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी या ऑनलाइन सत्रांत भाग घ्यायला हवा.

-बलविंदर सिंह, शहर समन्वयक, सीबीएसई

CBSE Board Skill Development Training Activities