CBSE : सीबीएसईने देशातील २० शाळांची संलग्नता केली रद्द

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) काही शाळांमध्ये डमी विद्यार्थी दाखविणे, मनमानी आर्थिक कारभार करणे, नोंदी योग्यप्रकारे न ठेवणे, अशाप्रकारे गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
CBSE
CBSESakal

Pune News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) काही शाळांमध्ये डमी विद्यार्थी दाखविणे, मनमानी आर्थिक कारभार करणे, नोंदी योग्यप्रकारे न ठेवणे, अशाप्रकारे गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गैरप्रकार होत असलेल्या अशा २० शाळांची थेट संलग्नता आणि मान्यता काढून घेण्याची कारवाई सीबीएसईने केली आहे.

सीबीएसईच्या नियमावली आणि निकषानुसार शाळा सुरू आहेत की नाही, हे तपासण्यासाठी देशभरातील शाळांची पाहणी मंडळातर्फे करण्यात आली. या पाहणी दरम्यान काही शाळांमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

सीबीएसईने देशातील अशा २० शाळांची थेट मान्यताच काढून घेतली आहे. मान्यता काढून घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्रातील दोन शाळांचा समावेश आहे. त्यात पुण्यातील पायोनिअर पब्लिक स्कूल आणि ठाण्यातील राहुल इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांचा समावेश आहे. मान्यता काढून घेतलेल्या शाळांमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार होत असल्याची बाब सीबीएसईच्या तपासणीत आढळून आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

देशातील सीबीएसईच्या शाळांची संख्या वाढत असून अनेक शाळा एकदा संलग्नता आणि मान्यता घेतल्यानंतर मंडळाशी कोणताही संबंध ठेवत नसल्याने दिसून येते. म्हणून सीबीएसईतर्फे काही शाळांची तपासणी करण्यात आली.

त्यात मंडळाने दिलेल्या निकषांचे, परीक्षा आणि त्यासंबंधित नियमांचे पालन होत आहे की नाही, हे तपासण्यात आले. त्यात मंडळाला संलग्नता काढलेल्या शाळांमध्ये परीक्षेच्या काळात थेट डमी विद्यार्थी बसवून परीक्षा देत असल्याची बाब निदर्शनास आली. तसेच अपात्र ठरविलेल्या विद्यार्थीही देखील शाळेत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे अशा शाळांवर थेट कारवाई करत मंडळाशी असणारी संलग्नता काढून घेण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला. अशाप्रकारे संलग्नता आणि मान्यता काढून घेतलेल्या शाळांची यादी सीबीएसईने ‘https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html’ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्याशिवाय विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांचा तपशील जाणून घेण्यासाठी ‘https://saras.cbse.gov.in/saras/Home/Category_Wise’ ही लिंक सीबीएसईने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com