esakal | CBSE बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कसे? दोन दिवसांत निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

student

CBSE बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कसे? दोन दिवसांत निर्णय

sakal_logo
By
नामदेव कुंभार

CBSE Class 12 Board Exam Result 2021: देशातील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (CBSE)दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पण विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन कसे करणार? याबाबतचा प्रश्न सर्वांसमोर आहे. सीबीएसईने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही, पण 16 जून किंवा 17 जून रोजी त्याच्या निकषांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थी CBSE च्या संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती त्यावेळी पाहू शकतील.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणाऐवजी ग्रेडच्या आधारावर पास करण्यात येणार आहे. याबाबत सध्या विचार सुरु आहेत. चार जून रोजी सीबीएसईने एका 13 सदस्यीय समितीची स्थापना केली होती, जी विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन कसं करायंचं? यावर दहा दिवसांत आपला रिपोर्ट देणार होती.

या दोन आधारावर जाहीर होणार निकाल?

1) दहावी आणि अकरावीचे गुण तसेच बारावीच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर निकाल तयार केला जाऊ शकतो.

2) दहावीचे गुण आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावार रिझल्ट तयार केला जाऊ शकतो.

15 जुलैनंतर लागणार निकाल?

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल 15 जुलैनंतर जारी होऊ शकतो. कारण, बोर्डाने शाळांना ऑनलाइन परीक्षा घेण्यास आणि त्याचे गुण अपलोड करण्यास २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत निकालाची तयारी करण्यासाठी बोर्डाला कमीत कमी दोन आठवड्याचा कालावधी लागेल. त्यामुळे 15 जुलैनंतर निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

हेही वाचा: ३८ बायका,८९ मुलं; जगातल्या सर्वात मोठ्या कुटुंब प्रमुखाचं निधन

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सीबीएसईनं शालेय आधारित मूल्यांकनामध्येही काही बदल केले आहेत. काही शाळा कोरोना महामारीमुळे प्रॅक्टिकल किंवा अंतर्गत मूल्यांकन परीक्षा घेऊ शकल्या नाहीत. हे लक्षात घेता बोर्डाने शाळांना ऑनलाइन परीक्षा घेण्यास आणि त्याचे गुण अपलोड करण्यास २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. ज्या विषयांच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात येणार आहेत, अशा विषयांची यादीही सीबीएसईने गेल्या आठवड्यात जाहीर केली होती. लेखी आणि प्रॅक्टिकल गुणांचे विभाजन, प्रकल्पाची वेळ आणि परीक्षांचा कालावधी याबाबतही माहिती देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. २०२१ या वर्षी १२ वीच्या परीक्षांबाबत नोंदणीकृत उमेदवारांसाठीचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'मोदींचं व्यक्तीगत स्वागत करु न शकल्यामुळे UK पंतप्रधान निराश'

loading image