esakal | CBSE चे निकालासाठी पोर्टल ओपन; बोर्डाकडून शाळांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE Board

CBSE चे निकालासाठी पोर्टल ओपन; बोर्डाकडून शाळांना आदेश

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने 12 वीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी केली आहे. गुणांच्या मॉडरेशनसाठी 16 जुलै ते 22 जुलै या कालावधीत पोर्टल ओपन राहणार आहे. या कालावधीत शाळांना 10 आणि 11 वीच्या गुणांचे मूल्यमापन पूर्ण करता येणार आहे. बोर्डाकडून याबाबत नोटिस पाठवण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्डाने म्हटलं की, अकरावी बारावीच्या गुणांच्या मूल्यांकनासाठी पोर्टल ओपन करण्यात आलं आहे. 16 जुलै ते 22 जुलैपर्यंत पोर्टल ओपन असेल. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाईल. याबाबतचं पत्र सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांना पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा: ड्रोनबाबत नवा कायदा; केंद्राने जारी केला ड्राफ्ट

बोर्डाने असंही म्हटलं आहे की, एखाद्या शाळेकडून दिलेल्या मुदतीमध्ये मूल्यांकन न झाल्यास त्यांचे निकाल हे 31 जुलैनंतर वेगळे जाहीर करण्यात येतील. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे यासाठीचे निकष बोर्डाने आधीच जाहीर केले आहेत. दहावी, अकरावीच्या परीक्षेचे गुण आणि बोर्डाची पूर्व परीक्षा यांचे गुण मिळून निकाल दिला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो बोर्डाच्या साइटवर (cbse.gov.in, cbseresults.nic.in) विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

loading image