CBSE Exam : सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले.
CBSE Board
CBSE Boardesakal

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान होणार आहे.

या परीक्षेत दोन विषयांच्या पेपरमध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात आला आहे. या परीक्षेचे वेळापत्रक खूप आधीच जाहीर करण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेची चांगली तयारी करता येणार आहे, असे मंडळाने परिपत्रकात म्हटले आहे. मंडळाच्या ‘https://www.cbse.gov.in’ या अधिकृत संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com