CBSE : विषय नोंदविताना चुका झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा सीबीएसईचा इशारा

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती पाठविताना विषय भरताना काही चुका झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसू दिले जाणार नाही
CBSE
CBSEsakal

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे विषय नोंदविताना चूक झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा बसू दिले जाणार नाही, असा इशारा सीबीएसईने दिला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि माहिती (लिस्ट ऑफ कॅंडिडेटस्‌) सीबीएसईने शाळांकडून मागविली आहे. ही माहिती सीबीएसईला पाठविण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे.

दरम्यान, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती पाठविताना विषय भरताना काही चुका झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यासमवेत विद्यार्थ्यांची माहिती, विषय अचूक नोंदविण्यास सांगितले आहे.

मागील काही वर्षात बोर्डाच्या परीक्षेत शाळा आणि विद्यार्थी-पालकांकडून काळजीपूर्वक आणि गांभीर्याने परीक्षा अर्ज भरला नसल्याचे सीबीएसईच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने अधिकृत परिपत्रक काढत शाळांना अर्ज काळजीपूर्वक आणि योग्यरीत्या भरण्याची सूचना दिली आहे.

२०२४मध्ये बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व शाळांनी माहिती भरताना ती अचूक आणि योग्य असावी याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी संबंधित शाळा आणि मुख्याध्यापकांनी मंडळाने यापूर्वीच दिलेल्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती नोंदविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सर्व सूचना काटेकोरपणे माहीत असाव्यात, कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात. पालकांनीही आपल्या पाल्याची अचूक माहिती भरली जाईल, याकडे लक्ष द्यावे. एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे संबंधित शाळांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची योग्य माहिती भरावी. विद्यार्थ्यांची अचूक माहिती अपलोड करण्याची जबाबदारी शाळांची आहे. त्यामुळे शाळांनी देखील विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाकडे देण्यापूर्वी ती अचूक आणि योग्य असल्याची खात्री करावी, असे सीबीएसईने सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com