Jobs : CDAC यामध्ये सरकारी नोकऱ्यांची संधी! पगार 1.65 लाख दरमहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CDAC
CDAC यामध्ये सरकारी नोकऱ्यांची संधी! पगार 1.65 लाख दरमहा

CDAC यामध्ये सरकारी नोकऱ्यांची संधी! पगार 1.65 लाख दरमहा

सोलापूर : सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आहे आनंदाची बातमी. भारत सरकारच्या (Government of India) इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवान्स्ड कॉप्युटिंग (Center for the Development of Advanced Computing - CDAC) ने विविध प्रकल्पांसाठी 111 प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार CDAC च्या अधिकृत वेबसाइट cdac.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2021 निश्‍चित करण्यात आली आहे.

हेही वाचा: 10वी-12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!जाणून घ्या सविस्तर

असा करा ऑनलाइन अर्ज...

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या पेजवर दिलेल्या जाहिरातींमधून संबंधित जाहिरातीवर क्‍लिक करावे लागेल. यानंतर नवीन पेजवरील सूचना वाचल्यानंतर उमेदवारांना संबंधित पदासाठी 'अप्लाय ऑनलाइन' लिंकवर क्‍लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पेजवर उमेदवार विचारलेले तपशील भरून अर्ज सबमिट करू शकतात. तसेच, उमेदवारांना 200 रुपये विहित शुल्क देखील भरावे लागेल.

हेही वाचा: चालू आर्थिक वर्षात SBI ला 9.6 टक्के विकासदर वाढीची अपेक्षा!

पदांचा तपशील...

 • प्रोजेक्‍ट मॅनेजर (नॉलेज पार्टनर) : 6 पदे

 • प्रकल्प अभियंता : 15 पदे

 • प्रकल्प अभियंता : 53 पदे

 • प्रोजेक्‍ट मॅनेजर (नॉलेज पार्टनर) - IT सुरक्षा - 1 पद

 • प्रकल्प अभियंता (सुरक्षा विश्‍लेषण) : 5 पदे

 • वरिष्ठ प्रकल्प अभियंता (UI-UX) : 7 पदे

 • प्रकल्प व्यवस्थापक (नॉलेज पार्टनर) - गुणवत्ता हमी : 1 पद

 • प्रकल्प अभियंता (वरिष्ठ प्रकल्प अभियंता) - सॉफ्टवेअर चाचणी : 2 पदे

 • प्रकल्प अभियंता - सॉफ्टवेअर चाचणी : 3 पदे

 • प्रोजेक्‍ट मॅनेजर (नॉलेज पार्टनर) - डेटाबेस : 1 पद

 • प्रकल्प व्यवस्थापक (वरिष्ठ प्रकल्प अभियंता) - डेटाबेस : 1 पद

 • प्रकल्प अभियंता (वरिष्ठ प्रकल्प अभियंता) - DevOps : 1 पद

 • प्रकल्प अभियंता (वरिष्ठ प्रकल्प अभियंता) - कुबरनेट्‌स : 2 पदे

 • प्रकल्प अभियंता - कुबरनेट्‌स : 1 पद

 • प्रकल्प अभियंता - DevOps : 2 पदे

 • प्रकल्प व्यवस्थापक : 5 पदे

 • प्रकल्प अभियंता (सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक) : 1 पद

 • प्रकल्प अभियंता - स्पीच टेक्‍नॉलॉजी : 2 पदे

 • प्रकल्प अभियंता (वरिष्ठ प्रकल्प अभियंता) : 2 पदे

loading image
go to top