महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा होणार नाही

Railway
Railway

Railway Recruitment 2021: पुणे : महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी चालून आली आहे. मध्य रेल्वेने २५३२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर या विभागांसाठी असणार आहे. 

विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेख परीक्षा होणार नाही. दहावी आणि आयटीआयला मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरआरसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे. 

भरती संबंधित महत्वाची माहिती - 
अर्ज करण्याची तारीख - ६ फेब्रुवारी २०२१
अर्ज करण्याची अंतिम तारीख - ५ मार्च २०२१
अर्ज फी - १०० रुपये

आवश्यक पात्रता -
सदर उमेदवार दहावी किंवा बारावीमध्ये किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या ट्रेडमधून आयआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

कोणत्या विभागात किती रिक्त जागा
मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या विभागात एकूण २५०० हून अधिक पदे रिक्त आहेत. 

मुंबई - 
कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) - २५८ पदे
मुंबई-कल्याण डिझेल शेड - ५३ पदे
कुर्ला डिझेल शेड - ६० पदे
सीनिअर डीईई (टीआरएस) कल्याण - १७९ पदे
सीनिअर डीईआरई (टीआरएस) कुर्ला - १९२ पदे
परळ वर्कशॉप - ४१८ पदे
माटुंगा वर्कशॉप - ५४७ पदे
एस अॅण्ड टी वर्कशॉप, भायखळा - ६० पदे

भुसावळ -
कॅरेज अॅण्ड वॅगन डेपो - १२२ पदे
इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ - ८० पदे
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा - ११८ पदे
मनमाड वर्कशॉप - ५१ पदे
टीएमडब्ल्यू नाशिक रोड - ४९ पदे

पुणे -
कॅरेज अॅण्ड वॅगन डेपो - ३१ पदे
डिझेल लोको शेड - १२१ पदे

नागपूर -
इलेक्ट्रिक लोको शेड - ४८ पदे
अजनी कॅरेज अॅण्ड वॅगन डेपो - ६६ पदे

सोलापूर -
कॅरेज अॅण्ड वॅगन डेपो - ५८ पदे
कुर्डुवाडी वर्कशॉप - २१ पदे

- आरआरसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com