esakal | निकालाचा पत्ता नाही अन्‌ CET अर्जांची मुदत संपली; विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम
sakal

बोलून बातमी शोधा

date of CET examination application

निकालाचा पत्ता नाही अन्‌ CET अर्जांची मुदत संपली

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोना महामारीमुळे (Corona virus) शैक्षणिक क्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. त्‍यामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध यंत्रणा, विभागांमध्ये ताळमेळही राहिला नसून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. बारावीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसतानाच व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या विविध सीईटी परीक्षांच्‍या अर्जाची मुदत संपली आहे. परिणामी, गुणांची माहिती नसल्याने नेमक्‍या कुठल्‍या शिक्षणक्रमाची निवड करावी, याबाबत पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. (CET-exam-application-date-edcutional-marathi-news)

अभ्यासक्रम निवडीविषयी विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

गेल्‍या शैक्षणिक वर्षापासूनच कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्र बाधित झाले आहे. ऑनलाइन अध्ययनात मर्यादा येत असूनही, अभ्यासक्रम कसाबसा शिकवून पूर्ण केला गेला. दुसरीकडे कोरोना महामारीमुळे बारावीची लेखी परीक्षा होऊ शकली नाही. यावर तोडगा काढत मूल्‍यमापनावर आधारीत निकाल जाहीर करण्याची भूमिका राज्‍य शासनाने घेतली. निकालाचे सूत्रदेखील निश्‍चित झाले आहे, असे असताना अद्याप निकाल जाहीर झालेला नसल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत आहे. दुसरीकडे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांच्‍या अर्जाची मुदत संपली आहे किंवा नजीकच्‍या काही दिवसांत संपत आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्‍या संभ्रमात भर पडली आहे.

हेही वाचा: ‘नीट’सह अन्य सामाईक परीक्षा स्थगितीचा केंद्राचा विचार नाही

UGC सूचनांचे पालन कठीणच

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मार्फत जारी दिशानिर्देशांनुसार ३० सप्‍टेंबरपर्यंत पदवीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्‍या सूचना देण्यात आल्‍या आहेत. तसेच, शैक्षणिक वर्षातील द्वितीय सत्र १ ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचेही सूचविले आहे. असे असताना प्रवेशप्रक्रियेची सध्याची स्‍थिती बघता, या सूचनांचे पालन होणे कठीण वाटू लागले आहे.

CET अर्जांची स्थिती

* अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र व बी. एस्सी. (कृषी) प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षा अर्जाची मुदत १५ जुलैला संपली आहे.

* मुदतवाढ दिल्‍यानंतर विधी शाखेतील एलएलबी (पाच वर्षे) शिक्षणक्रम सीईटीची मुदत गेल्‍या मंगळवारी (ता. २०) संपली आहे

* बी. ए., बी. एड./बी. एस्सी. बी.एड.च्‍या सीईटी अर्जाची वाढीव मुदत १६ जुलैला संपली

* हॉटेल मॅनेजमेंट सीईटीची मुदत ३० जुलैला संपत आहे

* नियमित शुल्‍कासह फाइन आर्टच्‍या सीईटीची २८ पर्यंत मुदत

(CET-exam-application-date-edcutional-marathi-news)

हेही वाचा: बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

loading image
go to top