esakal | CET Exam : बुधवारपासून परीक्षांना राज्‍यभरात सुरवात; प्रवेशपत्र उपलब्‍ध
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

CET Exam : बुधवारपासून परीक्षांना राज्‍यभरात सुरवात

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा (CET exam) घेतली जाणार आहे. नुकताच सीईटी सेलने सीईटी परीक्षांच्‍या तारखांची घोषणा केली होती. त्‍यानुसार बुधवार (ता. १५)पासून परीक्षांना राज्‍यभरात सुरवात होत आहे. विविध परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) प्राप्त करून घेण्यासाठी लिंक उपलब्‍ध करून दिली आहे.

हेही वाचा: रेल्वेमध्ये दहावी व आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची संधी!

सीईटी परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्‍ध

सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशासाठी होणाऱ्या एमबीए/एमएमएस-सीईटी, शिक्षणशास्‍त्र शाखेतील एम.पी.एड.-सीईटी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या एमसीएच्‍या प्रवेशासाठी एमसीए- सीईटी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले आहे. यासोबत एम.आर्क.-सीईटी, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजीत प्रवेशासाठी एमएएच-एम.एचएमसीटी-सीईटी परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्यासाठी संकेतस्‍थळावर लिंक उपलब्‍ध आहे. लिंकद्वारे उपलब्‍ध होणाऱ्या संकेतस्‍थळावर विद्यार्थ्यांनी त्‍यांचा अर्जाचा क्रमांक (ॲप्लि‍केशन नंबर) आणि जन्‍मतारीख दाखल करत प्रवेशपत्राची प्रत मिळवायची आहे. या प्रवेशपत्रावरील माहिती तपासात, तसेच सूचनांचे बारकाईने वाचन करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. एकूण १५ अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, टप्प्‍याटप्प्‍याने या सर्व शिक्षणक्रमांच्‍या सीईटीचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध केले जाणार आ

हेही वाचा: दहावी-बारावी बाहेरून परीक्षा देणार आहात? पाहा अर्ज भरण्याची तारीख

loading image
go to top