esakal | रेल्वेमध्ये दहावी व आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची संधी! 'अशी' होईल निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Railway jobs

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

रेल्वेमध्ये दहावी व आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची संधी!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : रेल्वेमध्ये (Indian Railway) दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway - SECR) ने अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एसईसीआर एकूण 339 पदांची भरती करेल. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र आहेत, ते रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट secr.indianrailways.gov.in वर जाऊन अधिसूचना वाचू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की ते 05 ऑक्‍टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी apprenticeship.org वर या पदांसाठी अर्ज करावा. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हेही वाचा: 'ओएनजीसी'ची 'जीटी' पदांसंदर्भात महत्त्वाची अधिसूचना !

एसईसीआरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वेल्डर, सुतार, फिटर, इलेक्‍ट्रिशियन, स्टेनो, प्लंबर, वायरमन, पेंटर, इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिकल डिझेल आणि इतर पदांवर भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावेत. याशिवाय, तुमच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवाराने पदांसाठीची सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा; कारण अर्जात काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

अशी होईल निवड

उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारे अप्रेंटिस पदांसाठी निवड केली जाईल. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

हेही वाचा: भारतीय नौदलात 'या' पदांसाठी होणार भरती! 5 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज

यापूर्वी, पश्‍चिम रेल्वेच्या रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) ने गट "क'च्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या होत्या. क्रीडा कोट्याद्वारे विविध गट क पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 21 पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे यादरम्यानची अट होती. तथापि, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबरची मुदत संपून गेली आहे.

loading image
go to top