

CET Percentile Row Should Students Be Judged by Their Class 12 Marks
ESakal
दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा देतात. मात्र, टक्केवारी आणि पर्सेंटाइल या दोन संकल्पना एकाच समजण्याचा गैरसमज आजही कायम आहे. प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. टक्केवारी म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले याचे मोजमाप. तर पर्सेंटाइल हे त्या विद्यार्थ्याची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांच्या तुलनेत असलेली कामगिरी दर्शवते. म्हणजेच, ते केवळ गुण नव्हे तर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेतील क्रमवारी दर्शवते.