संधी करिअरच्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Career Opportunity

संधी करिअरच्या...

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे दिल्ली येथील सार्वजनिक हॉस्पिटल आणि मेडिकल संशोधनासाठी सुरू केलेले स्वायत्त विद्यापीठ आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर च्या अंतर्गत ‘एम्स’चे कार्य चालते.

भारतीय विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण तसेच उच्च मानकांची देखभाल करण्यासाठी ही संस्था भारत सरकारने १९५६मध्ये स्थापन केली. भारतातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय अशी ‘एम्स’ची ख्याती आहे. सध्या भारतात जोधपूर, पाटणा, रायपूर, भोपाळ, भुवनेश्वर, ऋषिकेश, रायबरेली, नागपूर, मंगलगिरी, गोरखपूर, तेलंगणा, बठींदा, कल्याणी, देवगड, राजकोट, गुवाहाटी, विजयपूर आणि विलासपूर अशा १८ शहरात ‘एम्स्’ सुरू आहेत. लवकरच ही संख्या २४ पर्यंत पोहोचणार आहे. संस्थेने अनेक परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना संयुक्त संशोधनाच्या तसेच दोन संस्थांमध्ये विद्यार्थी अदलाबदल करण्याच्या संधी उपलब्ध होतात. सध्या दिल्ली येथे ४२ शाखांमध्ये विविध पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरल, सुपर स्पेशलायझेशन कोर्सेस उपलब्ध आहेत. या सर्व कोर्सेसमध्ये एमबीबीएसचा कोर्स प्रसिद्ध आहे.

‘एम्स’मधील महत्त्वाचे कोर्सेस...

१. बी.एस्सी (B.Sc) - (६ कोर्सेस)

पात्रता : १० + २ (५०-५५ टक्के गुणांसह)

कालावधी : ३ किंवा ४ वर्षे (पूर्ण वेळ)

प्रवेश परीक्षा : एम्स्

हा कोर्स ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, डेंटल हायजीन, डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट, ऑप्टोमेट्री मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी आणि नर्सिंग या विषयात राबवला जातो.

२. एम.एस्सी (M.Sc) (१६ कोर्सेस)

कालावधी : २ वर्षे (पूर्ण वेळ)

पात्रता : पदवी (६० टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : एम्स् पदव्युत्तर

३. एम.बी.बी.एस (MBBS)

कालावधी : ५ वर्ष ६ महिने (पूर्णवेळ)

पात्रता : १०+२ (५० टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : नीट

४. मास्टर इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन (MHA)

कालावधी : २ वर्षे (पूर्णवेळ)

पात्रता : पदवी

५. एमडी (MD) (२३ कोर्सेस)

कालावधी : ३ वर्षे (पूर्णवेळ)

पात्रता : पदवी (५५ टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : INI CET

६. बी.एस्सी (पोस्ट बेसिक)

कालावधी : २ वर्ष (पूर्णवेळ)

पात्रता : १०+२

प्रवेश परीक्षा : एम्स्

७. डी.एम. (२८ कोर्सेस)

कालावधी : ३ वर्ष ६ महिने (पूर्णवेळ)

पात्रता : पदवी (५५ टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : INI CET

८. एम.एस. (५ कोर्सेस)

कालावधी : ३ वर्ष (पूर्णवेळ)

पात्रता : पदवी

प्रवेश परीक्षा : INI CET

९. एमडीएस (५ कोर्सेस)

कालावधी : ३ वर्ष (पूर्णवेळ)

पात्रता : पदवी (५५ टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : INI CET

१०. एम.सी.एच. (१० कोर्सेस)

कालावधी : ३ वर्ष ६ महिने (पूर्ण वेळ)

पात्रता : पदवी (५५ टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : INI CET

११. पीएच.डी. (४५ कोर्सेस)

पात्रता : पदव्युत्तर (५५ टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : एम्स्

१२. पी.जी. डिप्लोमा

पात्रता : पदव्युत्तर (५५ टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा : NEET PG

या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एम्स् (AIIMS) आणि INICET या दोन्ही प्रवेश परीक्षांची माहिती विद्यार्थी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देऊन देऊ शकतात.

संकेतस्थळ : https://www.aiims.edu/

-सविता भोळे

Web Title: Chance Of Career Medical Sector Guide Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationCareer
go to top