CISF Job : १०वी उत्तीर्णांची सीआयएसएफमध्ये भरती; ७० हजारांपर्यंत पगार घेण्याची संधी

या व्यतिरिक्त, पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेमीपेक्षा कमी आणि महिला उमेदवारांची उंची १५५ सेमीपेक्षा कमी नसावी.
CISF
CISFgoogle

मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. २१ जानेवारी २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. (CISF Recruitment 2023)

या CISF भरती अंतर्गत, कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांसाठी ४५१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यासाठी १०वी उत्तीर्ण उमेदवार २२ फेब्रुवारीपर्यंत CISF च्या अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

CISF
Agniveer Bharati : १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच करता येणार भारतीय लष्करातील नोकरीसाठी अर्ज

शैक्षणिक पात्रता

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार १०वी उत्तीर्ण असावेत. यासोबतच त्यांना अवजड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन किंवा हलके मोटार वाहन आणि मोटार सायकल चालविण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

या व्यतिरिक्त, पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेमीपेक्षा कमी आणि महिला उमेदवारांची उंची १५५ सेमीपेक्षा कमी नसावी.

वयोमर्यादा

CISF साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील (SC, ST, OBC, इ.) उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

CISF
BSF Recruitment 2023: १०वी आणि १२वी उत्तीर्णांना बीएसएफमध्ये नोकरीची संधी; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने १०० रुपये शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती इत्यादींचे उमेदवार आणि सर्व महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

पगार

CISF भरती परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना पे-मॅट्रिक्स लेव्हल ३नुसार, वेतनमान रु. २१,७०० ते रु. ६९,१०० मिळेल.

असा करा अर्ज

सर्व प्रथम CISF cisfrectt.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

लॉगिन पृष्ठावर क्लिक करा.

आता "नवीन नोंदणी" बटणावर क्लिक करा.

तुमची माहिती एंटर करा.

आता 'फायनल सबमिट' बटणावर क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com