BSF Recruitment 2023 | १०वी आणि १२वी उत्तीर्णांना बीएसएफमध्ये नोकरीची संधी; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज | Recruitment in BSF job for 10th and 12th passers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSF Job

BSF Recruitment 2023: १०वी आणि १२वी उत्तीर्णांना बीएसएफमध्ये नोकरीची संधी; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

BSF Recruitment 2023 : बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (BSF) व्हेटर्नरी स्टाफमधील ग्रुप-सी (गैर-राजपत्रित) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार rectt.bsf.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२३ पर्यंत आहे.

या BSF भरती मोहिमेत एकूण 26 कॉन्स्टेबल पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी 18 रिक्त जागा एचसी (पशुवैद्यकीय) आणि 08 कॉन्स्टेबल (कॅनेलमन) या पदासाठी आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावी. (recruitment in BSF job for 10th and 12th passers ) हेही वाचा - सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार ?

शैक्षणिक पात्रता

एचसी (पशुवैद्यकीय) : मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पशुवैद्यकीय स्टॉक असिस्टंटमधील किमान एक वर्षाचा अभ्यासक्रम आणि उत्तीर्ण झाल्यानंतरचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.

कॉन्स्टेबल (केनेलेमन) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय फार्ममधून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

या बीएसएफ भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. SC/ST/महिला/माजी सैनिक आणि BSF उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज

  • सर्व प्रथम BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट द्या.

  • "सीमा सुरक्षा दल, पशुवैद्यकीय कर्मचार्‍यातील गट-सी लढाऊ (नॉन-राजपत्रित) पदांची जाहिरात" अंतर्गत "येथे अर्ज करा" वर क्लिक करा.

  • तपशील भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.

  • फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

निवड प्रक्रिया

निवड अनेक टप्प्यात होईल. उमेदवारांना लेखी परीक्षेच्या फेरीतून जावे लागेल, त्यानंतर शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणी होईल.