
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या निविदा प्रक्रियेवर विशेष लक्ष राहणार आहे.
'मेडिकल कॉलेज'च्या टेंडरवर अनेक कंपन्यांचा डोळा
सातारा : साताऱ्यात शासकीय मेडिकल कॉलेज (Satara Government Medical College) सुरू झाले असून एमबीबीएसच्या (MBBS) पहिल्या बॅचचे शिक्षण सुरू झाले आहे. आता इमारतींचे काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या ४५० कोटींच्या टेंडरसाठी निविदापूर्व बैठक नुकतीच झाली. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेंडर खुले होणार आहे. या टेंडरवर गुजरात (Gujarat), चेन्नई, दिल्लीसह महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक कंपन्यांचा डोळा आहे.
हेही वाचा: कर्नाटकात भीषण अपघात; लग्न संपवून परतताना 6 जणांवर काळाचा घाला, 9 जखमी
सातारा शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षीच्या बॅचची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षणही सुरू झाले आहे. एक जागा रिक्त असून त्यासाठी देशभरातील एकूण ३५२ रिक्त जागांसाठी पुन्हा एकदा उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे ही रिक्त जागा त्यानंतरच भरली जाईल. सध्या सर्वांचे लक्ष आहे, ते मेडिकल कॉलेजच्या ४५० कोटींच्या टेंडरवर. सध्या ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या आहेत. पण, अद्यापपर्यंत कोणीही निविदा भरलेल्या नाहीत. देशभरातून अनेक कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
नुकतीच इच्छुक असलेल्या ११ कंपन्यांची निविदापूर्व बैठक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन झाली. त्यामध्ये काही सोयी-सुविधा, बदल, आराखडा आदींविषयी चर्चा झाली. या शंकांचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निरसन केले आहे. मेडिकल कॉलेजच्या निविदा प्रक्रियेत अहमदाबाद (गुजरात), चेन्नई, दिल्ली, महाराष्ट्रातील दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे हे टेंडर मिळण्यासाठी मोठा घोडेबाजार होणार, हे निश्चित आहे. त्यासाठी केंद्र व राज्य पातळीवरून ताकद लागण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत तरी कोणीही निविदा भरलेली नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन टेंडर खुले होईल. त्यानंतरच प्रत्यक्ष आणखी किती कंपन्या सहभागी झाल्यात, हे समजणार आहे. त्यानंतर बोली व इतर बाबी होतील. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यास जून महिना उजाडेल. कमी किमतीच्या निविदेला मान्यता देऊन कामाला सुरवात होणार आहे.
हेही वाचा: Kashmir : बारामुल्ला चकमकीत दहशतवादी 'कांतरू'सह तिघांना कंठस्नान
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लक्ष
गुजरात, चेन्नईसह महाराष्ट्रातील कंपन्यांचा सातारा मेडिकल कॉलेजच्या निविदेवर डोळा असल्याचे सध्याचे चित्र आहे. पण, या स्पर्धेत महाराष्ट्रातीलही काही कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोणाला टेंडर मिळणार, याची उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे या निविदा प्रक्रियेवर विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे चांगल्या काम करणाऱ्या कंपनीलाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
Web Title: Companies From Gujarat Chennai Delhi And Maharashtra Are Interested In Tendering For Satara Medical College
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..