esakal | शिक्षणातील सातत्यासाठी ‘अध्ययन आराखडा’
sakal

बोलून बातमी शोधा

online student

शिक्षणातील सातत्यासाठी ‘अध्ययन आराखडा’

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव -GMinakshi_Sakal

पुणे : कोरोनामुळे गेले दीड वर्ष विद्यार्थ्यांना घरात बसून शिक्षण घ्यावे लागले. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘सातत्याने अध्ययन आराखडा’ कार्यान्वित केला आहे. यात राज्य सरकारने शाळा, शिक्षक यांच्यासह पालकांवर देखील जबाबदारी निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची पोकळी भरून काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे यातून शिक्षण विभागाने अधोरेखित केले आहे.

हेही वाचा: Pune Corporation : वाहनतळाच्या थकबाकीदार ठेकेदारांना दणका

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची पोकळी भरून काढण्यासाठी निश्चित अध्ययन आराखड्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ‘सातत्याने अध्ययन आराखडा’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत त्यांची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, त्यांच्याजवळ उपलब्ध असणारी साधने आणि सुविधानुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवणे, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययनाचे नियोजन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांवर दिली आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची अंमलबजावणी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: पावणे पाच हजार कोटीच्या नदी सुशोभीकरण प्रकल्पाला गती

"विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील काळात खबरदारी घेण्याच्या उद्देशाने शाळा, मुख्याध्यापक, पालक यांना जबाबदारीची जाणीव होण्यासाठी हा आराखडा कार्यान्वित केला आहे. राज्यातील प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, त्यानुसार सध्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणात रमविण्यावर भर दिला जात आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातील."

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

शाळा व शिक्षकांची भूमिका

 • विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाचे विविध स्रोत उपलब्ध करून देणे

 • विद्यार्थ्यांच्या शंकांचे वेळोवेळी निरसन करावे

 • एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही, यासाठी पाठपुरावा करणे

 • सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) विद्यार्थी पूर्ण करेल, याची खबरदारी घेणे

 • शिकविण्यात सातत्य राहण्यासाठी आवश्यकतेनुसार

 • अध्ययन साहित्याचा वापर करणे

 • विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देणे

मुख्याध्यापकांची जबाबदारी

 • शाळेतील शिक्षकांच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थ्याचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे

 • सर्व शिक्षक १०० टक्के विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतील, याची दक्षता घेणे आवश्यकता भासल्यास गृहभेटी, कट्टा शाळा असे उपक्रम राबविणे

पालकांकडून अपेक्षा

 • पालकांनी वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहावे

 • पाल्यास शैक्षणिक साहाय्य करणे

 • पाल्यांच्या अध्ययनसंदर्भातील प्रश्न शिक्षकांपर्यत पोचवून त्यांचे मार्गदर्शन घेणे

loading image
go to top