जगातील 'या' देशांत शिक्षकांना मिळतो सर्वाधिक 'पगार'

School Teachers
School Teachersesakal
Summary

सरकारी शाळांमधील शिक्षकांची नोकरी (School Teachers) भारतात खूपच लोकप्रिय आहे.

सरकारी शाळांमधील शिक्षकांची नोकरी (School Teachers) भारतात खूपच लोकप्रिय आहे. सरकारी शाळेत शिक्षक भरतीनंतर पगार आणि सुविधाही चांगल्या दिल्या जातात. मात्र, तरीही शिक्षक रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना आपल्याला पहायला मिळतील. तर, अनेकजण डॉक्टर, इंजिनिअर अथवा आयएएस-आयपीएसची (IAS-IPS) स्वप्नं पाहताना दिसतील. त्यामुळे काहीजण शिक्षक नोकरीत समाधानी आहेत, तर काही असमाधानी असल्याचे चित्र आहे. जगातील शिक्षकांच्या पगाराबाबत वातावरण इतके चांगले नाही, परंतु असे अनेक देश आहेत, जिथं हायस्कूल शिक्षक होणं ही आयएएस-आयपीएसपेक्षा काही कमी नाही.

जागतिक बँक आणि लर्निंग पोलिस इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, शिक्षकांना जगभरात खूप कमी पगार दिला जातो. अनेक देशांत शिक्षकांच्या कमतरतेला सामोरे जाण्याचं प्रमाणही सर्वाधिक आहे. नॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन स्टॅटिस्टिक्सकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील अनेक राज्यांनी 2009-2010 पासून शिक्षकांच्या वेतनात सरासरी 4.6% कपात केलीय. परिणामी, इतर देशांतील शिक्षकांना आउटसोर्स करावे लागताहेत. तर, काही देशांमध्ये शिक्षकांचे पगार खूपच चांगले आहेत.

School Teachers
जेव्हा नोबेल ॲकॅडमीचा Call आला, तेव्हा कादंबरीकार गुर्नाह स्वयंपाक करत होते!

'या' देशातील शिक्षकांना सर्वाधिक 'पगार'

युरोपमधील लक्झेंबर्ग शहरात शिक्षकांचं वार्षिक वेतन 58,91,995.22 रुपये आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंटच्या (OECD) अहवालानुसार, लक्झेंबर्गमध्ये जगातील सर्वाधिक वेतनप्राप्त शिक्षक आहेत. येथील माध्यमिक शिक्षक त्यांच्या परदेशी सहकाऱ्यांपेक्षा खूप जास्त कमावतात. लक्झेंबर्गमधील शिक्षकांना 30 वर्षांच्या कारकिर्दीनंतर सर्वाधिक पगार मिळतो. तथापि, युरोपियन कमिशनने 2017/2018 ते 2018/2019 या कालावधीत लक्झेंबर्ग शिक्षकांच्या पगारात क्वचितच बदल केलाय. युरोपमध्ये हा देश स्टीलसाठी ओळखला जातो. या देशात एका व्यक्तीला वार्षिक वेतन किमान 38,951 डॉलर दिलं जातं. त्या व्यक्तीच्या वेतनातून 37.7 टक्के टॅक्स कापल्याशिवाय पगार मिळत नाही. पण, 38 हजार डॉलरपेक्षा कमी उत्पन्न असणारी व्यक्तीसुद्धा या देशात नाही.

जगातील सगळ्यात उत्तम देशांपैकी स्वित्झर्लंड ओळखला जातो. या देशाला सरकारी पारदर्शकता, आर्थिक आणि मानव विकास यासाठी हा देश ओळखला जातो. स्वित्झर्लंडमध्ये सरासरी वार्षिक वेतन 33,491 डॉलर आहे. सर्वाधिक वेतन असलेल्या शिक्षकांच्या यादीत स्वित्झर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथं शिक्षकांना वर्षाकाठी 51,90,214.94 रुपयांचं पॅकेज मिळतं. 2018 च्या एका आघाडीच्या मीडिया फर्मच्या अहवालानुसार, स्वित्झर्लंडमधील शिक्षण व्यवस्था सक्तीची आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकावर असूनही येथील शिक्षकांचे वेतन इतर अनेक जॉब प्रोफाइलपेक्षा कमी आहे.

School Teachers
14 वर्षापूर्वी ज्यानं वाचवलं, त्याच्याच कुशीत गोरिलानं सोडला अखेरचा श्वास

जर्मनीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन कमी दिलं जातं. या देशातील लोक त्यांच्या वेतनानुसार 49.8 टक्क्यापर्यंत टॅक्स देतात. जर्मनीत सरासरी 31,252 डॉलर वार्षिक उत्पन्न आहे. सर्वाधिक पगाराच्या यादीत जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथं शिक्षकांचं वार्षिक उत्पन्न 47,73,219.27 रुपये आहे. जर्मनीतील शिक्षण व्यवस्था इतर देशांपेक्षा फार वेगळी आहे. येथील बहुतांश विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकतात, परंतु बहुतेक वर्ग जर्मनमध्ये चालतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नंतर समस्या निर्माण होऊ शकते. जर्मनी आणि युरोपियन देशांमध्ये जगाच्या इतर देशांच्या तुलनेत होमस्कूलिंग बेकायदेशीर आहे.

नॉर्वे हा स्कँडेनेव्हियन देश जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. या देशाकडे नैसर्गिक स्त्रोत असल्याने ही श्रीमंती आहे. त्यांच्याकडे तेल, हायड्रोपॉवर, फिशिंग आणि खनिजं मोठ्या प्रमाणात आढळून येतात. नॉर्वेमध्ये लोकांना मिळणाऱ्या उत्पनातून 37 टक्के टॅक्स कापला जातो. त्यानंतर त्यांचं सरासरी वार्षिक उत्पन्न 33, 492 डॉलर आहे. नॉर्वे आपल्या शिक्षकांना 35,22,943.10 रुपयांचे पॅकेज देऊन चौथ्या क्रमांकावर आहे. नॉर्वेमधील हायस्कूल शिक्षक खूप जास्त पगार मिळवतात आणि घर, वाहतूक आणि इतर फायद्यांसह सरासरी पगारासह जगात चौथ्या क्रमांकावर आहेत. शिक्षकांचे वेतन पूर्णपणे अनुभव, कौशल्य, लिंग किंवा स्थानावर आधारित आहे. हे शिक्षकाच्या अनुभवाच्या पातळीवर देखील आधारित आहे, जिथं वर्षानुवर्षांच्या अनुभवामुळे तुम्हाला जास्त पगार मिळेल. नॉर्वे त्याच्या द्विभाषिक आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये प्री-पॅट मुलांसाठी परदेशातून अनेक शिक्षक भरती करतो.

School Teachers
कॅलिफोर्नियात दुष्काळाच्या झळा; पाण्यासाठी घेतायत दीड कोटींचे मशीन

सर्वाधिक पगार देणाऱ्या 10 देशांची यादी

  • लक्झेंबर्ग- 58,91,995.2282

  • स्वित्झर्लंड - 51,90,214.9404

  • जर्मनी- 47,73,219.2762

  • नॉर्वे- 35,22,943.1058

  • डेन्मार्क- 34,83,544.8306

  • युनायटेड स्टेट्स- 32,43,236.3496

  • मेक्सिको- 31,88,117.3346

  • स्पेन- 31,18,905.2754

  • ऑस्ट्रेलिया- 30,35,173.5162

  • नेदरलँड - 29,11,238.5692

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com