थेट नकार देण्याऐवजी..

आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक पेचप्रसंग येतात की, जिथे आपण काय बोलतो, त्याचा परिणाम वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंधांवरही होऊ शकतो.
technic
technicsakal

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक पेचप्रसंग येतात की, जिथे आपण काय बोलतो, त्याचा परिणाम वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंधांवरही होऊ शकतो. अशा वेळी फार जपून बोलावे लागते. कनिष्ठ सहकारी, कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्राला एखाद्या गोष्टीवर अभिप्राय देतानाही काळजी घ्यावी लागेत. तुम्हाला जर त्यांना ‘नाही’ म्हणायचे असेल, नकार द्यायचा असेल, तर त्यांचे मन दुखावणार नाही अशा पद्धतीने बोलावे लागते.

अशा वेळी कशा प्रकारे बोलायचे? हेच आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी ‘सँडविच’ तंत्राचा वापर करावा. ‘सँडविच’ तंत्र म्हणजे सकारात्मक-नकारात्मक-सकारात्मक अशा प्रकारे बोलणे. यामुळे समोरच्याला नकार पचवण्यास मदत होते. त्याला एकदम वाईट वाटत नाही.

उपयुक्त अभिप्राय देणे आणि केवळ टीका करणे यात अस्पष्ट रेषा असते. ती कधीही ओलांडू नये. ‘रचनात्मक टीक’ करण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे. विधायक टीका करणे म्हणजे केवळ दोष दाखवणे नव्हे, तर त्या ऐवजी, वाढ, शिक्षण आणि विकासाला चालना देणाऱ्या सूचना करणे. हे समजून घेण्यासाठी उदाहरणपर प्रसंग पाहूया.

प्रसंग - प्रोजेक्टबाबत टीमला अभिप्राय

कल्पना करा की. तुम्ही टीम लीडर/पालक आहात आणि तुमचे टीम सदस्य/मुलाला तुम्ही अभिप्राय देत आहात. त्यांनी नुकतेच प्रोजेक्टवर काम केले आहे.

प्रशंसा आणि पावती : ‘या प्रकल्पासाठी तुम्ही जी मेहनत घेतली, त्याचे मी कौतुक करतो. काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेला, हे मी पाहिले आणि त्यामुळेच माझे लक्ष वेधले गेले.’

सुधारणा : ‘एकूण प्रकल्प चांगल्या प्रकारे पूर्ण झाला आहे. मात्र, माझ्या लक्षात असे आले की, टीममधील काही सदस्यांमधील संवाद अधिक वाढवला जाऊ शकतो. भविष्यात प्रकल्पांमध्ये काम करताना तुम्ही अधिक संवादी राही आणि आपण सगळे एक आहोत व समान पातळीवर आहोच याच भावनेने काम करा.’

सकारात्मक टिप्पणी : ‘असे असूनही, वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याची आणि कामात उच्च दर्जाची गुणवत्ता राखण्याची तुमची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, संवादातील अडथळे दूर करून तुम्ही भविष्यातील प्रकल्पही यशस्वी कराल.’

नाही म्हणण्याचे कौशल्य

नाही म्हणणे हे एक कौशल्य आहे. यामुळे नातेसंबंधांमधील सीमारेषा निश्‍चि करता येतात. आपला वेळ वाचतो आणि प्राधान्यक्रमही ठरवता येतो.

प्रसंग एक : सामाजिक कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारणे

सकारात्मक दाद : आमंत्रणाबद्दल खूप खूप धन्यवाद! कार्यक्रम अत्यंत छान होईल, यात शंका नाही!

रचनात्मक अभिप्राय : दुर्दैवाने, मी या वेळी येऊ शकत नाही. मला अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने मी ते टाळू शकत नाही.

सकारात्मक पाठिंबा : मी येऊ शकत नसलो, तरी कार्यक्रमाबद्दल सर्व ऐकण्यास उत्सुक आहे. मला भविष्यातील कार्यक्रमांचीही माहिती द्या. पुढच्या वेळी सहभागी व्हायला मला नक्कीच आवडेल!

प्रसंग दोन : अतिरिक्त जबाबदाऱ्यांना नकार

सकारात्मक दाद : या जबाबदारीसाठी तुम्ही माझा विचार करून माझ्या क्षमतेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे.

विधायक अभिप्राय : मला प्रकल्पाला खात्रीशीर यश मिळवून द्यायचे आहे, पण सध्याच्या कामाचा ताण आणि प्राधान्यक्रम लक्षात घेता असे वाटते की, मी त्या कामाला न्याय देऊ शकणार नाही. परंतु, मी अशा व्यक्तीला जोडून देऊ शकतो की, जी यासाठी सर्वार्थाने योग्य असेल.

सकारात्मक पाठिंबा : तुमच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प खूप यशस्वी होईल, हे नक्की. भविष्यात मी यासाठी काही योगदान देऊ शकेल, असे वाटते. त्यामुळे भविष्यात असे काही काम असल्यास मला आवर्जून सांगा. तुम्हाला मला मदत करण्यात मला आनंदच होईल.

औपचारिक आणि अनौपचारिक प्रसंगांमध्येही ‘सँडविच’ पद्धतीने संवाद साधला जाऊ शकतो. त्यामुळे नात्यांमधील आदर आणि सुसंवाद कायम राहूनही नकार देणे सोपे होते. हे तंत्र आपण शिकले पाहिजे आणि आपल्या मुलांनादेखील शिकवले पाहिजे. संवादाची अशी आणखी व्यावहारिक तंत्रे जाणून घेण्यासाठी इन्स्टाग्रामवर pranjal_gundesha या पेजला आणि यु-ट्यूबवर ‘द इंटेलिजन्स प्लस’ या चॅनेलला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com