date of set exam announced by university examination will held on 7th April 2024
date of set exam announced by university examination will held on 7th April 2024esakal

Pune News : विद्यापीठातर्फे सेट परीक्षेची तारीख जाहीर; ७ एप्रिल २०२४ रोजी होणार परीक्षा

७ एप्रिलला होणार आयोजन; लवकरच सुरू होणार अर्ज प्रक्रिया

पुणे : राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा अर्थात सेटची घोषणा करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने ७ एप्रिल २०२४ रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सेटची ही ३९ वी परीक्षा असून पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन) होणारी ही शेवटची परिक्षा असणार आहे.

तर यानंतरची ४० वी सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येईल. विद्यापीठाकडून १९९५ पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. ही परिक्षा ३२ विषयांसाठी घेण्यात येते.

१७ शहरांमधील जवळपास २६२ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत ही परीक्षा घेतली जाते.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसून, लवकरच ती जाहीर होईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली आहे. शेवटची सेट परीक्षा याच वर्षी २३ मार्चला झाली होती. ज्यात जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com