MVP वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मेरिट फॉर्मची मुदत 'या' तारखेपर्यंत

मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या (MVP) वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
MVP
MVPesakal
Updated on

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या (MVP) वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्ता अर्ज (मेरिट फॉर्म) भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून, २३ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. संकेतस्‍थळाला भेट देत संबंधित महाविद्यालयाची निवड करून मेरिट फॉर्म भरायचा आहे.

मविप्र संस्‍था संचालित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी हा मेरिट फॉर्म भरणे आवश्‍यक आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना आपल्‍या पात्रतेनुसार प्रवेश निश्‍चित करता येईल. पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://mvperp.org या संकेतस्थळाला भेट देऊन आपला मेरिट फॉर्म भरायचा आहे. त्‍यासाठी सोमवार (ता. १३)पासून प्रक्रिया सुरू होत असून, २३ जूनपर्यंत संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

MVP
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग: ऑटोमेशन क्षेत्रातील सुसंधी

...अशी असेल पुढील प्रक्रिया

ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी मेरिट फॉर्मची प्रिंट काढून जपनू ठेवायची आहे. प्रथम गुणवत्तायादी २५ जूनला दुपारी चारला संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेश अर्ज भरायचा आहे. प्रवेश अर्ज भरताना मूळ गुणपत्रिका (मूळ गुणपत्रिका मिळालेली नसेल, तर ऑनलाइन गुणपत्रिकेची प्रत जोडावी), शाळा सोडल्याचा मूळ दाखला, गॅप सर्टिफिकेट, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, रहिवासी दाखला, जातवैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. प्रवेश अर्ज भरल्यानंतर तो प्रवेश अर्ज प्रवेश समितीकडून प्रमाणित झाल्यानंतर संकेतस्थळला भेट देऊन ऑनलाइन प्रवेश अर्ज शुल्‍क भरायचे आहे. प्रत्यक्ष महाविद्यालयास भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने प्रवेश शुल्‍क भरता येईल. शुल्‍क भरल्‍याची पावती जपून ठेवायची आहे. त्यानंतर भरलेला प्रवेश अर्ज महाविद्यालयात कामकाजाच्या वेळेत जमा करायचा आहे. या वेळी मूळ कागदपत्रे व त्‍यांच्‍या छायांकित प्रती जमा करायच्‍या आहेत.

MVP
यंदापासून 'एमसीए'चा अभ्यासक्रम दोन वर्षाचा ; तंत्र शिक्षण विभागाचे पत्र

...या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी प्रक्रिया

कला (बीए), वाणिज्‍य (बी.कॉम.), विज्ञान (बी.एस्सी.) यांसह बी.एस्सी. (बायोटेक्‍नॉलॉजी), बी.एस्सी. (कॉम्‍प्‍युटर सायन्‍स), बीबीए, बीसीए, बी.एस्सी. (सायबर ॲन्ड डिजिटल सायन्‍स), बी.एस्सी. (ब्‍लेंडेड सायन्‍स), बी.एस्सी. (ॲनिमेशन) यांसह इंटेरियर डिझाइन, प्रिंटिंग टेक्‍नॉलॉजी, मास मीडिया, डायरेक्‍ट ॲन्ड इन्डायरेक्‍ट टॅक्‍स, ड्रामॅटिक्‍स या विषयातील बी.व्‍होक. अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालयांत जागा उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com