esakal | इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग: ऑटोमेशन क्षेत्रातील सुसंधी
sakal

बोलून बातमी शोधा

 Instrumentation Engineering

इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग: ऑटोमेशन क्षेत्रातील सुसंधी

sakal_logo
By
टीम YIN युवा

प्रा. अरुण द. लिंमगावकर

विद्यमान आणि पारंपारिक शिक्षण प्रणालीत कोरोना साथीच्या आजाराने सर्वात मोठा व्यत्यय आणला आहे, कोरोनाचा एकूणच परिणाम शिक्षण जगांवर झाला आहे. या २१ व्या शतकातील तांत्रिक घडामोडींचा विचार केल्यास मूलभूतदृष्ट्या मजबूत आणि लवचिक शैक्षणिक सुधारणांचा समावेश करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी सामावून घेणारी इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) इंजिनियरिंग हि अंतःविषय (Interdisciplinary) अभियांत्रिकी शैक्षणिक शाखा भारतामध्ये खूप पूर्वी पासून चालू आहे. या अंतःविषय शाखेमध्ये मुख्यता इलेक्ट्रोनिक्स, संगणक, ऑटोमेशन, केमीकल अभियांत्रिकी आदी शाखांचा समावेश होतो. सध्याचे परवलीचे शब्द डाटा माईनिंग, डाटा अनालीटीक्स संबंधी ज्ञानाचा देखील या शाखेमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

तसेच “कोविड-१९” सारख्या भयंकर महामारीने तर सर्वच क्षेत्रातील ऑटोमेशन संदर्भातील महत्वच जणू अधोरेखित केले आहे. इथेच इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विद्याशाखेचे महत्व अधोरेखित होते. “कोविड-१९” मुळे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील खूप बदल करावे लागत आहेत. या बदलांशी जुळवून घेताना आपल्याला वैद्यकीय क्षेत्रातील वैयक्तिक वापराच्या उपकरणांची जसे कि डिजिटल थर्मोमीटर, ऑक्सिमिटर, डिजिटल स्पायरोमीटर इ. गरज अधोरेखित होत आहे.

हेही वाचा: देशात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू; गडकरींचा VIDEO VIRAL

हि सर्व उपकरणे वाजवी किमतीत बनविणे इन्स्ट्रुमेंटेशन सारख्या अभियांत्रिकी मुळे सहज शक्य होते. इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मुळे उत्पादनाचा दर्जा तसेच उत्पादन क्षमता यामध्ये वाढ होते तसेच उत्पादन दरात कपात होते. सर्वात महत्वाचे म्हणजे इंन्स्टुमेनटेशन अभियांत्रिकीमुळे उत्पादन/उत्पादक कंपनीमध्ये मानव सुरक्षा देखील प्रस्थापित होते, ज्यामुळे अपघात होऊन भोपाल वायू गळती दुर्घटनांमुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळली जाऊ शकते. म्हणूनच या वाढत्या स्पर्धेमुळे आधुनिक जगामध्ये कोणत्याही इंडस्ट्रीला टिकून राहण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशनची नितांत गरज आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअर हा इंडस्ट्रीमध्ये “ऑटोमेशन इंजिनिअर” म्हणूनहि ओळखला जातो.

काही विद्द्यार्थ्याना सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग मध्ये प्रचंड रूची असते, त्यांना या लेखाद्वारे सांगू इच्छितो कि इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनिअरिंग देखील डी.सी.एस., स्काडा, पी.एल.सी., ऑटोमेशन स्टुडिओ, ऑटोकॅड, स्मार्ट प्लांट इन्स्ट्रुमेंटेशन (इन टूल्स) आदी वैशिष्टपूर्ण आव्हानात्मक सॉफ्टवेअर्सविना पूर्ण होऊ शकत नाही. यामुळेच ऑटोमेशनचे महत्व लक्षात घेऊन आजच्या विद्यार्थ्याला करियरच्या दृष्टीने या शाखेमध्ये शिक्षण घेणे गरजेचे ठरते.

हेही वाचा: उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची 'मन की बात' ऐकली का?

आपण हे जाणतोच आहोत कि, जो देश ऑटोमेशनला प्राधान्य देतो तोच देश लक्षणीय प्रगती करत आहे, उदा. युरोपातील देश, अमेरिका, चीन, जपान, सौदी अरेबिया. यामुळेच येणाऱ्या काळात भारतामध्येही इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या अभियंत्यांची नितांत गरज आहे. जेणे करून आपणही वर उलेख केलेल्या देशांइतकीच तोडीस तोड प्रगती करू शकू अन्यथा मागे पडत जाऊ.

आताचे ऑटोमेशन क्षेत्र प्रोसेस ऑटोमेशन, इंडस्ट्रीयल ऑटोमेशन, बिल्डींग ऑटोमेशन, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, साँफ्टवेअर इन्स्ट्रुमेंटेशन, रोबोटिक ऑटोमेशन, ऑटोमोबाईल इन्स्ट्रुमेंटेशन, माईनिंग ऑटोमेशन अशा बहुविध क्षेत्रात विभाजित आहे. वरील सर्व क्षेत्रामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रॉकवेल ऑटोमेशन, जॉन्सन कंट्रोल्स, लार्सन & टुब्रो, इन्फोसिस, इमरसन, महिंद्रा, एबीबी, सिमेन्स, बॉश, टाटा मोटर्स, हानिवेल, थर्मॅक्स, अल्फा लवाल, सँडविक एशिया, बी&आर ऑटोमेशन, रसायन उद्योग जसे खते, रंग इ., कापड उद्योग यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना ऑटोमेशनचे महत्व माहित आहे. बऱ्याच वेळा कुशल इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनिअर उपलब्ध नसल्यामुळे इतर इंजीनिअरला काही प्रमाणात ट्रेनिंग देवून कंपनीमध्ये वापरले जाते. या शेत्रातील तज्ञ लोकांची वरील कंपन्यामध्ये नितांत गरज आहे व त्यासाठी योग्य मोबदला देण्याचीहि कंपन्यांची तयारी आहे.

हेही वाचा: दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद

आपल्या भारत देशामध्ये इतर अभियंत्याच्या तुलनेत इन्स्ट्रुमेंटेशन अभियंत्याची संख्या कमी आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनिअर विदेशात नोकरी करतात. यामुळे ऑटोमेशनचे क्षेत्रात भारतीय कंपन्यां मागे आहेत. आपल्या देशात बाजारपेठ उपलब्ध आहे, योग्य इन्स्ट्रुमेंटेशनचा वापर करून आपला मोठा नफा विदेशात जाण्यापासून वाचवू शकतो. ज्या विद्यार्थ्याना खरच काही देशासाठी करण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर या क्षेत्राचा विचार करावा. कारण ऑटोमेशन येणाऱ्या काळाचे भविष्य उज्वल करू शकतो. ऑटोमेशनचे चांगले शिक्षण हि एका परीने देशसेवा ठरू शकते.

आता उच्च शिक्षणाबाबत, इन्स्ट्रुमेंटेशन अथवा इन्स्ट्रुमेंटेशन व कंट्रोल विषयाच्या पदवी अभ्यासक्रमानंतर त्याच विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. इतकेच नव्हे तर विद्युत महानिर्मिती, आर. सी. एफ., आय.पि.सी.एल., डी.आर.डी.ओ., इस्रो, नुक्लीअर पावर कॉर्पोरेशन, एन.टी. पी. सी., इंडिअन एअर फोर्स, नेव्हि, डॉक यार्ड आदी राज्य व केंद्र सरकारी संस्थामध्ये नौकरीसह संशोधनाच्या देखील संधी उपलब्ध आहेत. यामुळे या क्षेत्राचा करीअर म्हणून विचार करायला हरकत नाही.

loading image