esakal | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदत
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या विविध विभागांच्या २०१९-२० मधील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज (रि-अप्लाय) करण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज मुदत देण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असूनही अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहेत. (Deadline student scholarship is 5th August)

हेही वाचा: पीएमपीची निवडणूक हरली; पण सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइन पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. यामध्ये उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे.

हेही वाचा: गोळीबाराचा बदला घेण्यासाठी नगरसेवकानेच दिली आरोपीच्या खूनाची सुपारी

शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याबाबत संबंधित महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यांनी कळवावे. तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले शिष्यवृत्ती अर्ज संबंधित शैक्षणिक संस्था, तसेच विभाग स्तरावरून दररोज निकाली काढावे. हे अर्ज संस्था, विद्यापीठ स्तरावर प्रलंबित ठेवू नये. अर्जाची पडताळणी करताना प्रलंबित ठेवलेल्या अर्जांतील त्रुटीची पूर्तता करूनच ते पुढे पाठवावे. प्रलंबित राहिलेल्या अर्जांना संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी स्पष्ट केले आहे.

loading image