पंजाबपाठोपाठ महाराष्ट्रातही सीईटी न घेता‌ प्रवेश देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

पुणे, : बारावीनंतर व्यावसायिक‌ अभ्यासक्रमांच्या‌ प्रवेशासाठी सीईटी होणार का, कधी‌ होणार‌ याविषयी  विद्यार्थी‌ पालकांमध्ये चिंतेचे‌ वातावरण असतानाच पंजाब तंत्रशिक्षण विभागाने मात्र बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया करण्याचा‌ निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याच पद्धतीने प्रवेश का‌ करू नयेत,‌अशी चर्चा सुरू झाली आहे, तर काही खासगी विद्यापीठांनी एकत्र येत‌ त्यांची सीईटी घेऊन प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली आहे.

पुणे : बारावीनंतर व्यावसायिक‌ अभ्यासक्रमांच्या‌ प्रवेशासाठी सीईटी होणार का, कधी‌ होणार‌ याविषयी विद्यार्थी‌ पालकांमध्ये चिंतेचे‌ वातावरण असतानाच पंजाब तंत्रशिक्षण विभागाने मात्र बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया करण्याचा‌ निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याच पद्धतीने प्रवेश का‌ करू नयेत,‌ अशी चर्चा सुरू झाली आहे, तर काही खासगी विद्यापीठांनी एकत्र येत‌ त्यांची सीईटी घेऊन प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कृषी पदवी प्रवेशासाठी राज्य सरकार प्रवेश परीक्षा घेते. बारावीमध्ये खुल्या‌ गटातील विद्यार्थ्याला 50 टक्के गुण मिळाले की‌ तो सीईटी देण्यास पात्र ठरतो. आता कोरोनामुळे सीईटी घ्यायची‌ की नाही,‌ याबद्दल सरकारमध्येच‌ संभ्रम आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे प्रवेश परीक्षा कधी घ्यायची याविषयी राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यावर विचार सुरू असल्याचे‌ सरकारी यंत्रणांकडून सांगण्यात येते.

पंजाब पाठोपाठ महाराष्ट्रातही सीईटी न घेता व्यावसायिक‌ अभ्यासक्रमाचे‌ प्रवेश करावेत, अशी मागणी होते आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विनाअनुदानित‌ तंत्र शिक्षण संस्थांकडून ही मागणी‌ होत आहे. पंजाब तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश करण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आय. के. गुजराल पंजाब तंत्र विद्यापीठ, महाराजा रणजित‌ सिंग पंजाब तंत्र विद्यापीठ आणि पंजाब कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे बारावीच्या गुणांच्या‌ आधारे होणार आहोत. फार्मसीचे प्रवेशही प्रवेश परीक्षेशिवाय,‌ तर वास्तुकला पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे बारावी आणि कलचाचणीच्या आधारे होणार आहेत.

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

राज्यात सीईटी न झाल्यास
महाराष्ट्रात‌ अनेक वर्षांपासून सीईटी घेतली जाते. त्यामुळे तांत्रिक अभ्यासक्रमांना जाण्याची इच्छा‌ असणारे विद्यार्थी बारावीतील चांगले महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी बारावीच्या गुणांपेक्षा सीईटीमध्ये जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. आता बारावीच्या‌ गुणांवर प्रवेश दिल्यास ज्यांना हुशार असूनही कमी‌ गुण मिळाले, त्या‌ विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालय न मिळण्याचा‌ धोका आहे. त्यामुळे सीईटी व्हावी, अशी विद्यार्थ्यांची‌ अपेक्षा असेल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
राज्यातील काही खासगी आणि स्वयंअर्थसहाय्यित‌ विद्यापीठांनी त्यांची प्रवेश परीक्षा घेतली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 19 विद्यापीठांनी त्यांच्या‌ प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. परंतु त्यास‌ राज्य सरकारने अद्याप मान्यता दिली नसल्याने या प्रक्रियेद्वारे प्रवेश घ्यावा की नाही, या‌ संभ्रमात विद्यार्थी आहेत.

पुण्यातील आयआयटीपीयन प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, "सरकारने सीईटी न घेणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचे उल्लंघन असेल. राज्य‌ सरकारला सीईटी घेण्याबाबत‌ अडचण असेल, तर त्यांनी जानेवारीमध्ये झालेल्या जेईई मेन‌ या‌ परीक्षेच्या आधारे महाराष्ट्रातील महाविद्यालयांची प्रवेश फेरी करावी. ज्यांनी ही परीक्षा दिली नाही, त्यांना पुढे होणाऱ्या जेईई परीक्षेला बसण्याची‌ संधी‌ देऊन पुढील प्रवेश फेऱ्या कराव्यात. ही परीक्षा ऑनलाइन असल्याने सरकारचा सीईटी घेण्याचे कष्टही वाचतील."

११ वीसाठी निवडा आवडीचं महाविद्यालय; बुधवारपासून सुरू होणार दुसरा टप्पा!

राज्याच्या 'सीईटी सेल'चे आयुक्त संदीप कदम 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "राज्याच्या‌ सीईटीची तारीख निश्चित‌ झालेली नाही. त्यासाठी‌ सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत." खासगी विद्यापीठांनी प्रवेश परीक्षा घेतल्याचा मुद्दा निदर्शनास आणून दिला असता ते म्हणाले, "खासगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. त्यांच्या‌‌ स्तरावरच‌‌‌ त्यांची‌ प्रवेश प्रक्रिया होते."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for admission should start for vocational courses without taking CET In Maharashtra