आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊनही विद्यार्थी अद्याप शिक्षणापासून वंचित

प्रवेश निश्चिती होऊन दीड महिना झाला तरीही संबंधित शाळांनी या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अद्याप सुरू न केल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
rte
rteesakal
Updated on

पुणे : खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पालकांना करावी लागलेली वणवण विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही थांबलेली नाही. प्रवेश निश्चित होऊनही शहरातील काही शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग अद्याप सुरू न केल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात आहे. अशा शाळांविरोधात शिक्षण विभाग (School department) कठोर भूमिका घेत नसल्याचे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आरटीईनुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतंर्गत पहिल्या निवड यादीत नावे जाहीर झाल्यानंतर पालकांनी त्वरित शाळा प्रवेश घेतला. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण होऊन प्रवेश निश्चिती झाली. आता प्रवेश निश्चिती होऊन दीड महिना झाला तरीही संबंधित शाळांनी या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अद्याप सुरू न केल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

‘‘राज्य सरकारकडून देण्यात येणारा शुल्क परतावा खासगी शाळांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शाळांनी अद्याप २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले, परंतु प्रवेश देऊनही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. तर अद्याप काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात असल्याचे अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या २५ टक्के आरक्षण पालक संघाच्या अध्यक्षा सुरेखा खरे यांनी सांगितले.

rte
पुणे : महिला, बालकांच्या आरोग्याकडे ‘लक्ष’ वाढले

‘‘आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत पहिल्या निवड यादीत मुलीचे नाव लागले. त्यानुसार जूनमध्ये प्रवेशासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, अद्याप शाळेने ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले नाही. याबाबत शाळेला विचारले असता,‘आम्ही अजून मुलांचे ऑनलाइन शिक्षणच सुरू केलेले नाही,’ अशी उत्तरे मिळत आहेत. परंतु आता ऑगस्ट महिना आला, तरीही अद्याप इयत्ता पहिलीत असणारी मुलगी शिक्षणापासून वंचित आहे, अशी प्रतिक्रिया पालक सुप्रिया सोनावणे यांनी व्यक्त केली.

पालकांनी संबंधित शाळेविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार करा

प्राथमिक शिक्षण संचालनालय सहसंचालक दिनकर टेमकर याबाबत म्हणाले ‘‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळायला हवा. प्रवेश घेऊनही शाळा विद्यार्थ्यांचा (ऑनलाइन) शिक्षणाचा हक्क डावलत असल्यास, अशा शाळांविरोधात पालकांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करणे गरजेचे आहे.’’

rte
पोलीस कार्यालये ही जनतेच्या सेवेसाठीच; अमिताभ गुप्ता

राज्यातील आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची आकडेवारी :

तपशील राज्य पुणे

आरटीई २५ टक्के लागू असलेल्या शाळा : ९,४३२ ९८५

प्रवेशाच्या एकूण जागा : ९६, ६८४ १४,७७३

पहिल्या (लॉटरीत) यादीत निवडलेले विद्यार्थी : ८२,१२९ १४,५६७

निश्चित झालेले प्रवेश : ६०,७८७ १०,४०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com