
बिहारमध्ये नोकरीची संधी! एक हजार पदासाठी भरती
बिहारमध्ये (Bihar) समाजकल्याण विभागातर्फे (Social Welfare Department) पुढील महिन्यात विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर होणार आहेत. बिहारमधील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदांव्यतिरिक्त पुढील पाच वर्षांसाठी थेट भरतीतून पॅनल तयार करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षे याच पॅनलच्या आधारे जिल्ह्यात नियुक्त्या केल्या जाणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहे.
हेही वाचा: सोलापूर विभागात ६७ चालकांची भरती
समाजकल्याण विभाग आउटरीच वर्कर, काउंन्सेलर, पॅरा मेडिकल स्टाफ, हाऊस फादर, हाऊस मदर आणि सुपरिटेंडंट अशा सर्व पदांसाठी पॅनल तयार करणार आहे. गुणांच्या आधारे हे पॅनल काढले जाणार असून कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा (competitive exam) होणार नाही. विभाग जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यासाठी ऑनलाइन रिक्त जागा तयार करेल, जी ऑनलाइन भरली जाईल.
त्यानंतर विभाग गुणपत्रिकेच्या आधारे मुलाखत (Interview) घेईल आणि त्यानंतर पॅनेल तयार केले जाईल. एकदा तयार झालेले पॅनल पाच वर्षे प्रभावी ठरणार असून, कुठेही जागा रिक्त असल्यास प्राधान्याने पॅनलमधून नियुक्ती केली जाणार आहे.
हेही वाचा: Indian Oil : ज्युनियर इंजिनिअरच्या अनेक पदांसाठी भरती, अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या
विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी 2019 मध्ये सुमारे एक हजार पदांची थेट भरती करण्यात आली होती. आता आणखी एक हजार पदांसाठीची रिक्त जागा काढण्याच्या तयारीत आहे.
Web Title: Direct Recruitment In Social Welfare Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..