SSC Result: दहावीच्या निकालाची उत्सुकता लावणाऱ्या SSC बोर्डाचा इतिहास काय?

दहावीची परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इतिहास काय आहे?
Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education
Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Educationsakal

आज दहावीचा निकाल जाहीर झालाय. पण तुम्हाला माहिती आहे का की दहावीची परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इतिहास काय आहे? आज आपण त्या संदर्भात जाणून घेणार आहोत.

Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education
NCERT चा मोठा निर्णय; बारावीच्या अभ्यासक्रमातून 'गुजरात दंगली'चा विषय हटवला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या स्वायत्त संस्थेची स्थापना 1965 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 41 मधील तरतुदींनुसार 1 जानेवारी 1966 रोजी झाली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळांच्या मदतीने महाराष्ट्र राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा घेतात.

Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education
SSC RESULT: दहावीच्या निकालात मुलींची बाजी, राज्यात कोकण पहिला तर...

मंडळातर्फे वर्षातून दोन वेळा या परीक्षा घेतल्या जातात. मुख्य परीक्षेच्या उच्च माध्यमिक शालान्त अभ्यासक्रमासाठी साधारणपणे 14 लाख विद्यार्थी आणि माध्यमिक शालान्त अभ्यासक्रमासाठी 17 लाख विद्यार्थी सहभागी होतात.

ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी एकत्रितपणे साधारण 6 लाख विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र राज्यात सुमारे 21,000 माध्यमिक शाळा व 7000 उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

बोर्डाचे सर्वात प्रमुख कार्य दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करणे आहे. परीक्षा मार्च मध्ये आयोजित केले जातात आणि निकाल जूनमध्ये घोषित होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com