‘स्किल’फूल : डिजिटल स्किल्स

सर्वच क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने युवकांना डिजिटल स्किल्स आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.
Digital Skills
Digital SkillsSakal
Summary

सर्वच क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने युवकांना डिजिटल स्किल्स आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.

सर्वच क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने युवकांना डिजिटल स्किल्स आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. डिजिटल स्किल्स प्राप्त करताना त्यांचा विचार तीन टप्प्यात करावा लागतो आहे. बेसिक (मूलभूत) डिजिटल स्किल्स, अप्लाईड (उपयोगित) डिजिटल स्किल्स, अॅडव्हान्सड अप्लाईड (प्रगत उपयोगित) डिजिटल स्किल्स. ही तीन प्रकारची कौशल्ये असून प्रथमतः मूलभूत कौशल्यांना आत्मसात करून त्यांचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता ही अप्लाईड डिजिटल स्किल्समध्ये आहे. अद्ययावत तंत्रज्ञान कार्यामध्ये अॅडव्हान्स अप्लाईड डिजिटल स्किल महत्त्वाचे ठरते आहे.

तंत्रज्ञान संवाद (टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन), माहिती आणि सामग्री हाताळणी (इन्फॉर्मेशन अँड कन्टेन्ट हॅन्डलिंग) डिजिटल व्यवहार, (डिजिटल ट्रान्झॅक्शन्स) समस्या सोडवणे (प्रॉब्लेम सॉलव्हिंग), सुरक्षित आणि कायदेशीर ऑनलाइन असणे (सेफ अॅन्ड लीगल ऑनलाइन प्रेंझेन्स) आदी मूलभूत डिजिटल स्किल्स बरोबरच आपण कोणते डिजिटल टुल अथवा प्लॅटफॉर्म वापरत आहोत यावर कौशल्य निवडीची प्रक्रिया बदलते आहे.

बदलत्या काळात सॉफ्ट स्किल्सला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने डिजिटल कौशल्यांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. डिजिटल मार्केटिंग या मूलभूत कौशल्यांबरोबरच ईनफ्ल्युईनशिअल डिजिटल मार्केटिंग हे अप्लाईड डिजिटल स्किल आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट बेस्ड डिजिटल मार्केटिंग हे अॅडव्हान्सड अप्लाईड स्किल आता वेगवेगळ्या टप्प्यांवर कौशल्य प्राप्तीच्या परिणामांवर आधारित कार्यासाठी अत्यावश्यक झाले आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या सर्वे आणि विश्लेषणावर आधारित अंदाजानुसार बिग डेटा ॲनालिसेस, मोबाईल ॲप मार्केट, वेब बेसड ॲप्स आणि वेब बेसड मार्केट, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी क्षेत्रांमध्ये अनेक नवनवीन प्रकारची डिजिटल कौशल्ये निर्माण होत आहेत.

युवकांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारक्षम होण्यासाठीची डिजिटल स्किल्स आणि विशिष्ट क्षेत्रात नवनिर्माणाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची कौशल्ये पूर्णतः वेगळ्या स्वरूपाची आहेत. बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन, ई कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, इंटरप्राइजेज रिसोर्स प्लॅनिंग ही त्यापैकीच काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

परिणामकारक तंत्रज्ञान संवादासाठी लिखित साहित्य (रिटन कन्टेन्ट) ग्राफिक्स (चित्रमय) कन्टेन्ट, व्हिडिओ (ध्वनिचित्रफीत) कंटेट, (ध्वनिफीत) पॉडकास्टींग आदींचा वापर करताना आपण कोणते ॲप्स अथवा प्लॅटफॉर्म वापरत आहोत यावर आधारित डिजिटल कौशल्य प्राप्तीची गरज निर्धारित होत आहे. अशा प्रकारच्या विविध माहितीचे डिजिटल टूल्सद्वारे विश्लेषण करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असून त्यासाठी विशिष्ट प्रकारची डिजिटल टूल्स वापरून त्याची परिणाम काढता सिद्ध करण्याचे कौशल्य प्राप्त करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

सोशल मीडिया, डिजिटल मेसेजिंग, ब्लॉगिंग, वेब प्रेझेन्स, नेटवर्किंग ॲप्स आदी ठिकाणी व्यक्त होण्याच्या पद्धती तसेच डिजिटल विश्वातील सुरक्षित वावर करणे आणि योग्य ती दक्षता घेण्याची कौशल्ये प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. सातत्याने ऑनलाइन असणे आणि त्यातून निर्माण होणारी डिजिटल अॅडिक्शन (व्यसनाधिनता) व त्यावरील उपायासाठी डिजिटल वेलनेस कौशल्ये प्राप्त करण्याचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण ही आता उपलब्ध झाले आहे. स्पर्धेच्या युगात वेगाने बदलणाऱ्या डिजिटल कौशल्यांचा मागोवा घेऊन या क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांनी कौशल्य कालबाह्यतेचा विचार करणेही गरजेचे आहे.

(लेखक सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठामध्ये संशोधन प्रकल्प विभाग प्रमुख तसेच गुगल अप्लाइड डिजिटल स्किल्स अॅम्बेसिडर आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com