वेध करिअरचा : पर्यावरण संवर्धनासाठी सस्टेनेबल स्टडीज अभ्यासक्रम

पर्यावरण आणि ग्रामीण शास्त्राचा शाश्‍वत विकास याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
environment conservation
environment conservationsakal
Summary

पर्यावरण आणि ग्रामीण शास्त्राचा शाश्‍वत विकास याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पर्यावरण आणि ग्रामीण शास्त्राचा शाश्‍वत विकास याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात अनेक आव्हाने असली तरी युवा पिढीला या क्षेत्रात योगदान देण्याची मोठी संधी आहे. ही संधी लक्षात घेऊन या सर्व समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाययोजना विकसित करून मानवी कल्याणासाठी आपण काम केल्यास खऱ्या अर्थाने देश समृद्ध होईल. यासाठी प्रशिक्षित व सर्जनशील विचारांच्या युवकांची गरज आहे. म्हणून हे अभ्यासक्रम या क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी नवीन पिढी तयार करण्यात महत्त्वाचे ठरतील.

एमएससी एन्व्हायरमेंटल सायन्स

जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या समस्या अधिक तीव्र होत असताना पर्यावरण संवर्धन आणि शाश्‍वत विकासासाठी लोकसहभाग आणि लोकांनी एकत्रित येणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमामध्ये जागतिक शाश्‍वततेचे विविध पैलू विद्यार्थ्यांना समजविले जातात व हरित विचार रूजविण्यास प्रयत्न केला जातो. यामध्ये निसर्गातील विविध परिसंस्था, जीवशास्त्र, जैवविविधता, हवामान बदल, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान, समाजशास्त्र, पर्यावरणीय कृती, संवर्धन जीवशास्त्र, प्रगत आकडेवारी, औद्योगिक विकास, पर्यावरण व्यवस्थापन नियोजन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, जीवनचक्र विश्‍लेषण इत्यादी विषयांचा समावेश आहे.

मास्टर इन पब्लिक हेल्थ

मास्टर इन पब्लिक हेल्थ हा दोन वर्षांचा पूर्ण वेळ चालणारा अभ्यासक्रम असून यात व्यवस्थापन व विज्ञानाशी निगडित विषय एकत्रित केले जातात. कोरोनापश्चात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आरोग्यसेवेची उपलब्धता, त्यासाठी असणाऱ्या आर्थिक गरजा, कुपोषण, पर्यावरणाच्याऱ्‍हासाने होणारा आरोग्यावर परिणाम अशा अनेक पैलूंशी अवगत करून त्यावर नावीन्यपूर्ण उपाययोजना शोधण्यास प्रोत्साहन देणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. या अभ्यासक्रमामध्ये ॲपिडेमोलॉजी, बायोस्टॅटिस्टिक्स, हेल्थ इकॉनॉमिक्स, पब्लिक हेल्थ रिसर्च, वित्तीय व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्यामध्ये कायदे व नैतिकता, आरोग्यसुरक्षा, जागतिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, जागतिक आरोग्य समस्या इत्यादी विषयांचा समावेश आहे.

मास्टर ऑफ सोशल वर्क

मानवी कल्याण हे सामाजिक कार्याचे मुख्य ध्येय असते. याचे विविध पैलू समजून घेऊन काम करणाऱ्या व्यावसायिकांची गरज आहे. या अभ्यासक्रमात सामाजिक कार्याचा इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, मानवी हक्क व सामाजिक न्याय यासारख्या विषयांचा समावेश आहे.

एमए इन रूरल कम्युनिटी डेव्हलपमेंट

भारताची खरी ताकद ही ग्रामीण भागात आहे. ग्रामीण क्षेत्राला अधिक सक्षम केल्यास जागतिक पातळीवर भारत आघाडीचा देश बनू शकतो. एमए इन रूरल कम्युनिटी डेव्हलपमेंट हा अभ्यासक्रम ग्रामीण क्षेत्रातील शाश्‍वत विकासात आपले योगदान देऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीला चांगली संधी आहे. या अभ्यासक्रमात शाश्‍वत विचारांसह ग्रामीण विकासाचे विविध पैलू समजून घेण्यास मदत होईल. ग्रामविकास हे सरकारचे प्राधान्य असताना प्रशिक्षित युवकांची गरज आहे. दुसरीकडे सीएसआर उपक्रमाअंतर्गत खासगी क्षेत्र व कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे ग्रामीण भागात अनेक नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात येतात. या अभ्यासक्रमात स्टॅटिस्टिक्स, हवामान बदल, विज्ञान, रिमोट सेंसिंग, भू-माहितीशास्त्र यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.

पीजी डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर क्लायमेट अ‍ॅक्शन

तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका ही जागतिक शाश्‍वत विकास, उद्दिष्ट्ये पूर्ण करणे आहे. हवामानातील बदलासंदर्भात फक्त पर्यावरणतज्ज्ञच नव्हे तर तंत्रज्ञान विकासाद्वारे युवा पिढी देखील त्यात मोठे योगदान देऊ शकते. हवामान बदलातील विविध जागतिक पैलू समजून त्यावर शाश्‍वत उपाययोजनांच्या दृष्टीने योगदान कसे देता येईल याचे महत्त्व या अभ्यासक्रमाद्वारे अधोरेखित होते. हा ११ महिने कालावधीचा डिप्लोमा अभ्यासक्रम असून विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील पदवीधर पात्र ठरू शकतात. यामध्ये शाश्‍वत विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंग, प्रोग्रॅमिंग विथ पायथॉन, ऑगमेंटेड व व्हर्च्युअल रिऍलिटी, लॅब टेक्निक्स इत्यादी विषयांचा समावेश आहे.

(लेखक एमआयटी डब्ल्यूपीयू प्र-कुलगुरू आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com