संवाद : तणाव व्यवस्थापन

सध्याचे महाविद्यालयीन जीवन तीव्र स्पर्धा, दुरावत असलेले नातेसंबंध, मित्र मैत्रिणींचा दबाव, करिअरचा ताण, प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, सोशल मीडियाचा प्रभाव अशा अनेक कारणांमुळे ताण निर्माण करण्यास कारणीभूत आहेत.
Tension
TensionSakal
Summary

सध्याचे महाविद्यालयीन जीवन तीव्र स्पर्धा, दुरावत असलेले नातेसंबंध, मित्र मैत्रिणींचा दबाव, करिअरचा ताण, प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, सोशल मीडियाचा प्रभाव अशा अनेक कारणांमुळे ताण निर्माण करण्यास कारणीभूत आहेत.

- प्रा. डॉ. सुमिता जोशी

सध्याचे महाविद्यालयीन जीवन तीव्र स्पर्धा, दुरावत असलेले नातेसंबंध, मित्र मैत्रिणींचा दबाव, करिअरचा ताण, प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, सोशल मीडियाचा प्रभाव अशा अनेक कारणांमुळे ताण निर्माण करण्यास कारणीभूत आहेत. थोडा ताण हा प्रत्येकासाठी आवश्यक असतो. परंतु हा ताण तीव्र स्वरूपाचा झाल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक ठरतो.

कारणीभूत घटक

१. व्यक्तिगत समस्या (हृदयविकार, मधुमेह, वैवाहिक समस्या)

२. भावनिक समस्या (उदासीनता, अपराधीपणाची भावना, नोकरी गमावणे अथवा नोकरीत असमाधान)

३. मित्र परिवाराचा अभाव अथवा जवळील व्यक्ती दुरावल्यामुळे येणाऱ्या नातेसंबंधातील समस्या आणि एकाकीपणाची भावना

४. आई, वडील किंवा जीवन साथीचा मृत्यू , कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या समस्या

५. मित्र मैत्रिणींचा दबाव, करिअरचा ताण

युवकांमधील तणावाची कारणे -

कुटुंबाची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती - पालकांच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी अर्धवेळ काम करून शिक्षण पूर्ण करतात. काही पैशांअभावी शिक्षणाला मुकतात.

पालकांचा दबाव - काहीवेळेस पालक त्यांच्या पाल्यावर विशिष्ट अभ्यासक्रम निवडण्याचा दबाव आणतात जे पाल्याचा मनाविरुद्ध असते.

उपलब्ध संधींच्या माहितीचा अभाव - शिक्षणातील उपलब्ध संधी तसेच करिअरसंबंधी माहितीचा अभाव

अप्रभावी संवाद कौशल्य - काही विद्यार्थांना इंग्रजी भाषेतून आवश्यक तो संवाद साधण्यात अडचणी येतात.

परीक्षेच्या निकालाची भीती - परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली सततची भीती.

भविष्याबद्दल अनिश्चितता - काही विद्यार्थी करिअर विषयी तसेच उच्च शिक्षणाबद्दल साशंक असतात.

मित्रमैत्रिणींचा दबाव - मित्रपरिवाराच्या दबावामुळे युवक स्वत-च्या उद्देशापासून दूर जातात आणि त्याचे परिवर्तन दारू, सिगारेट, ड्रग्ज अशा व्यसनात होते. अशा व्यसनांमुळे आणि चुकीच्या संगतीमुळे व्यक्तिगत अधोगती होते.

वसतिगृह आणि रॅगिंग - शिक्षणासाठी काही विद्यार्थी घरापासून लांब वसतीगृहात राहतात. त्यातील काही विद्यार्थी रॅगिंगसारख्या प्रकारांना बळी पडतात.

भावनिक असमतोल - कॉलेज जीवनाशी जुळवून ना घेता येणे, मित्रमैत्रिणी नसणे, एकटेपणाची जाणीव, मोबाईलचा अति वापर, सोशल मीडियाचा गैरवापर, तीव्र स्पर्धा यामुळे युवकांच्या जीवनात त्रासदायक घटना निर्माण होतात आणि नैराश्य येते.

तणाव व्यवस्थापन कसे करावे?

1) नियमित व्यायाम आणि चौरस आहार - नियमित व्यायाम, चौरस आहार तसेच चहा, कॉफी, तेलकट पदार्थ, अतिगोड पदार्थांच्या कमीतकमी सेवनाने ताण कमी होतो. व्यायामामुळे शरीर व मन निरोगी व आनंदी राहते. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी तीनवेळा व्यायाम करावा. व्यायामाची सवय नसलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा.

2) पुरेशी झोप आणि विश्रांती - पुरेशी झोप तसेच योग, ध्यानधारणा, मसाज, संमोहन यासारख्या विविध विश्रांती तंत्रांमुळे तणाव कमी होतो. तणाव व्यवस्थापनासाठी आवश्यक असल्यास डॉक्टरांची तसेच तज्ज्ञांची मदत घ्यावी.

3) तणाव व्यवस्थापन कार्यशाळा - व्यक्तिगत पातळीवर तणाव व्यवस्थापनाच्या कार्यशाळा तणाव नियंत्रित करण्यात मदत करतात. या कार्यशाळांमध्ये वेळेचे व्यवस्थापन, ध्येयनिश्चिती, समस्यांचे निराकरण अशा विषयांचा समावेश असतो. तणावाची कारणे आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना याचे प्रशिक्षण या कार्यशाळांमध्ये मिळते.

4) समुपदेशन - तणाव कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य अथवा जवळचे मित्रमैत्रिणी समुपदेशनाचे काम उत्कृष्ट करू शकतात. त्यासाठी ती व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञ असण्याची गरज नाही. जवळच्या व्यक्तीला आपल्या भावना अथवा समस्या सांगणे हा कमीपणा नसून ते एक ताण कमी करण्याचे प्रभावी साधन आहे.

5) डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे - अति तीव्र तणावांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचारांचा फायदा तणाव व्यवस्थापनासाठी होतो.

या उपायांचा योग्य उपयोग केल्यास तरुण वर्ग ताणविरहित व आनंदी जीवन व्यतीत करू शकते आणि त्याचबरोबर स्वत-च्या उत्तम कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करू शकते. तणाव व्यवस्थापन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली समजली जाते.

(लेखक एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com