स्कूल ऑफ डिफेन्समध्ये करिअरची संधी, पुण्यात DRDO मार्फत सुरुवात

DRDO
DRDOCanva

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अंतर्गत चालणारी पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) संस्थेतर्फे ‘स्कूल ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी’ची सुरवात करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून एमटेकचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच संरक्षण क्षेत्राशी निगडित अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमाचा यात समावेश आहे.

देशाच्या संरक्षणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) तसेच लष्कराच्या तिन्ही दलांतील अधिकाऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल, असे डीआयएटीमार्फत सांगण्यात आले. डीआयएटीतर्फे या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी इथिओपिया, बांगलादेश आदी देशांतील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आले आहेत. यासाठी डीआयएटीने डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांशी, संरक्षण क्षेत्रांशी संबंधित उद्योग (टीसीएस, एल अँड टी, भारत फोर्ज आदी) आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधला आहे.

काय आहे अभ्यासक्रम ः

संरक्षण तंत्रज्ञान आणि भविष्य तंत्रज्ञानाच्या प्रगत क्षेत्रात शिक्षण आणि संशोधनावर या माध्यमातून भर देण्यात येणार आहे. यात आर्मामेंट, कॉम्बॅट व्हेइकल्स, यूएव्ही, एअर आर्मामेंट, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, वाहन तंत्रज्ञान, संमिश्र संरचना यांसारख्या विषयांचा समावेश आहे. सैन्यासाठी शस्त्रे आणि यंत्रणांची रचना, चाचणी, लढाऊ वाहने, उच्च ऊर्जा सामग्री यासारख्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी ः दोन वर्षे

प्रवेश पात्रता ः अभियांत्रिकीची पदवी तसेच ‘गेट’ प्रवेश परीक्षा उत्तीर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com